घरमहाराष्ट्रलॉकडाऊनच्या कालावधीत १७ मेपर्यंत वाढ

लॉकडाऊनच्या कालावधीत १७ मेपर्यंत वाढ

Subscribe

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सूट

करोना विषाणूंचा संसर्ग अद्याप कमी झालेला नसल्याने देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आता देशात 4 मे पासून 17 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनदरम्यान ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही सूट देण्यात आल्या आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला होता. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे शुक्रवारी परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असेल आणि ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. रेल्वे, विमान, मेट्रो, आंतरराज्यीय रस्ते वाहतूक, शाळा, कॉलेज, इतर शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था, सिनेमागृह, मॉल बंदच राहणार आहेत.

- Advertisement -

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. यानंतर सायंकाळी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, रेल्वेमंत्री पियूष गोयल, केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप पुरी आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत करोना लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्याची समीक्षा करण्यात आली.

देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आलेय. ग्रीन झोनमध्ये आर्थिक घडामोडींना सूट देण्यात आलीय. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, ग्रीन झोनमध्ये ३०७ जिल्ह्यांत बस सेवा सुरू केली जाऊ शकेल. परंतु, बसची क्षमता ५० टक्क्यांहून अधिक राहणार नाही. त्यामुळे ५० आसनी बसमध्ये केवळ २५ प्रवासीच प्रवास करू शकतील. त्याच पद्धतीने डेपोमध्येही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत. या जिल्ह्यांत न्हावी, सलून यांसहीत अन्य महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू पुरवणार्‍या संस्थांनाही ४ मेपासून सूट मिळू शकेल. सिनेमा हॉल, मॉल, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इत्यादी बंद राहतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -