घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी सेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांचे हाल

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी सेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांचे हाल

Subscribe

मुंबई – बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या ६ वाहनांवर मंगळवारी दगडफेक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. कायदा आणि सुव्यस्था लक्षात घेता महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी सेवा तात्पुरत्या खंडीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, कर्नाटकात जाणाऱ्या येणाऱ्या १४५ एसटी फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. तसंच, पोलिसांच्या सूचनेनुसार या फेऱ्या आजही रद्द राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचा परिणाम ६६० बस फेऱ्यांवर होणार आहे.

हेही वाचा – सीमाप्रश्नी आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही, शिंदेंनी बोम्मईंना फोन केल्यानंतर केले ट्विट

- Advertisement -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढल्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच, महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्याने राज्यातील वातावरणही तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावलं उचलत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवा खंडीत करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून पुढील सूचना येईपर्यंत महाराष्ट्र-कर्नाट एसटी सेवा बंद राहणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असं असतानाच सोलापुरातील जत तालुक्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. तसंच, अक्कलकोट आणि सोलापूरमधील कन्नड भाषिक भाग कर्नाटकात विलीन करण्याची मागणी केली होती. यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कन्नडिगांचा बेळगावात भ्याड हल्ला

दरम्यान, महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने राज्याचे मंत्री चंद्रकात पाटील, शंभूराज देसाई बेळगावात कार्यक्रमासाठी जाणार होते. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावात न येण्याच्या सूचना केल्या. यावरून वाद उफाळून आला. मंगळवारी, महाराष्ट्रातून बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या सहा वहानांवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेने हल्ला केला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पोलिसांच्या सूचनेनुसार कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या १४५ एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -