Live Maharashtra Assembly : जुनी पेन्शन लागू करण्याबाबत शासन सकारात्मक, संप मागे घ्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

maharashtra assembly budget 2023-24

जुनी पेन्शन लागू करण्याबाबत शासन सकारात्मक, संप मागे घ्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


लाड-पागे समितीच्या निर्णयांची तंतोतंत अंमलबजावणी होणार- सामंत

सफाई कर्मचाऱ्यांसाठी १२ हजार घरे बांधणार

लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे पालिका आयुक्तांना निर्देश देणार – उदय सामंत


किती प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली – अजित पवार

पाटबंधारे, जलसंपदा मंत्री म्हणून निर्णय घेत नाहीत, कॅबिनेट म्हणून मान्यता मिळत असते.

जयंत पाटलांचे अनेक प्रकल्प मार्गी लावले नाहीत. त्यामुळे आतापर्यंत किती प्रकल्पांना मान्यता दिली याची माहिती पटलावर द्यावी – अजित पवार


विरोधकांकडून विधानपरिषदेचा सभात्याग

जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून विरोधकांचा विधानपरिषदेत गदारोळ

विधान परिषद दहा मिनिटांसाठी तहकूब


संपाचा परिणाम समाजातील सर्व स्तरांना बसतो- पवार

सरकारने भूमिका स्पष्ट करावी- अजित पवार


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात