‘काँग्रेसचे अस्तित्व कमी-कमी होत चालले’; काँग्रेसच्या बेरोजगारी दिवसाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा आज वाढदिवस असून देशभरात त्यांचा भाजपाकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे आजच म्हणजे 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून कॉंग्रेसकडून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा आज वाढदिवस असून देशभरात त्यांचा भाजपाकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे आजच म्हणजे 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून कॉंग्रेसकडून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप शासित राज्यांमध्ये यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, कॉंग्रेसने देशातील बेरोजगारी लक्षात घेत भाजपाविरोधात अनोखे आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे. (Maharashtra DCM Devendra Fadnavis Slams Congress nana patole)

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसकडून पाळला जात असलेल्या राष्ट्रीय बेरोजगार दिवसाला प्रत्युत्तर दिले. तसेच, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत, त्यांनी खोटी जात सांगितली असल्याचे म्हटले, त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

“नाना पटोलेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पटोल दिवसभर अशा काही-बाही गोष्टी बोलत असतात. त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात. त्यामुळे तुम्ही देखील गांभीर्याने घेऊ नका. नाना पटोलेंना असे झटके येत असतात. त्यामुळे ते असे काही बोलत असतात”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“काँग्रेसचे स्थान जनतेतही नाही आणि संसदेतही नाही. त्यामुळे काँग्रेस आपली जागा शोधत आहे. काँग्रेसचे अस्तित्व कमी-कमी होत चालले आहे. त्यामुळे त्यांनी एकच धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणे. देशातील लोकांनी चित्त्यांचे स्वागत केले आहे. मात्र, काँग्रेसमध्ये केवळ नकारात्मकता भरलेली आहे. त्यांनी याला विरोध केला. मिशन चित्ता अंतर्गत आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोदींच्या हस्ते नामिबियातून भारतात आणलेले 8 चित्ते मध्य प्रदेशातील अभयारण्यात सोडले गेले”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


हेही वाचा – सत्ता गेल्यामुळे विरोधकांची पाण्याविना माशासारखी फडफड : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर