घरताज्या घडामोडीNagar Panchayat Election Result 2022 Live Update: राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत भाजप...

Nagar Panchayat Election Result 2022 Live Update: राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकच पक्ष

Subscribe

नगरपंचायत निवडणुकीत भाजप अव्वल

नगर पंचायत निवडणूक निकाल
एकूण जागा: १८०२
निकाल जाहीर : १६३८

- Advertisement -

पक्षनिहाय मिळालेल्या जागा
भाजप : ३८४
राष्ट्रवादी काँग्रेस: ३४४
काँग्रेस : ३१६
शिवसेना : २८४
अपक्ष : २०६
नोंदणीकृत पक्ष : ८२
सीपीआय एम : ११
बसप : ०४
मनसे : ०४
अन्य :० ३


 

- Advertisement -

राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकच पक्ष

भाजप 384
राष्ट्रवादी 344
काँग्रेस 316
शिवसेना 284 #महाराष्ट्र


राज्यातील सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत.

राष्ट्रवादी २७

भाजप २२

काँग्रेस २१

शिवसेना १७

इतर १०


सोलापूरमध्ये ३२ ओबीसी उमेदवार विजयी

नातेपुते — 17 जागा , ओबीसी 12 विजयी

माळशिरस 17 जागा , ओबीसी 12 विजयी

माढा — 17 जागा , ओबीसी 4 विजयी

श्रीपूर महाळुंग — 17 जागा, ओबीसी 1 विजयी

वैराग — 17 जागा, ओबीसी 3 विजयी


साक्री नगरपंचायत निवडणूक निकाल

भाजप : 11 जागांवर विजयी

शिवसेना : 4 जागांवर विजयी

काँग्रेस : 1 जागेवर विजयी

अपक्ष : 1 जागेवर विजयी


पालघर जिल्हा नगरपंचायत निकाल

तलासरी नगरपंचायत निकाल
एकूण जागा १७
माकप – ०६ जागा विजयी
भाजप – ०६ जागा विजयी
शिवसेना – ०३ जागा विजयी
अपक्ष – ०२ जागा विजयी

विक्रमगड नगर पंचायत

एकूण जागा १७
जिजाऊ संघटना(अपक्ष) – १६ जागा विजयी
शिवसेना – ०१ जागा विजयी

मोखाडा नगर पंचायत निकाल
एकूण जागा 17
शिवसेना – 08 जागा विजयी
राष्ट्रवादी – 04 जागा विजयी
भाजपा – 02 जागा विजयी
जिजाऊ – 02 जागा विजयी
कोंग्रेस – 01 जागा विजयी


पोलादपूरमध्ये शिवसेनेचा झेंडा तर दापोलीत शिवसेना आघाडीचा विजय


नाशिकमधील ६ नगरपंचायत निवडणूक निकाल घोषित झाले आहे. ६ पैकी २ भाजप, २ राष्ट्रवादी, १ शिवसेना आणि एक महाविकास आघाडीने जागा जिंकली आहे.

निफाड नगरपंचायतीमध्ये सत्तांतर, भाजपला धक्का

निफाड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का

पेठ नगरपंचायतीवरील सेनेच्या वर्चस्वाला धक्का, राष्ट्रवादीचं वर्चस्व

कृषीमंत्री दादा भुसे, भाजपच्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का

६ नगरपंचायत घोषित निकाल

सुरगाणा नगरपंचायत
भाजपचं वर्चस्व, सेनेला धक्का
एकूण जागा – १७
शिवसेना – 06
भाजप – 08
माकप – 02
राष्ट्रवादी काँग्रेस – 01

देवळा नगरपंचायत
भाजपचा एकहाती विजय
एकूण जागा – 17
भाजप – 15
राष्ट्रवादीला – 2

निफाड नगरपंचायत
भाजपची सत्ता उलथवली, शिवसेनेचा भगवा फडकला
एकूण जागा – 17
शिवसेना- 07
राष्ट्रवादी काँग्रेस- 03
काँग्रेस – 01
शहर विकास आघाडी – 04
बसपा- 01
इतर(अपक्ष)-01

कळवण नगरपंचायत
राष्ट्रवादीचं वर्चस्व, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना धक्का
एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 09
भाजप – 02
काँग्रेस – 03
शिवसेना – 02
मनसे – 01

दिंडोरी नगरपंचायत
शिवसेनेला सर्वाधिक जागा, महाविकास आघाडीकडे सत्ता
एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 05
शिवसेना – 06
काँग्रेस – 02
भाजपा – 04

पेठ नगरपंचायत
सेनेचं वर्चस्व संपुष्टात, राष्ट्रवादीकडे सत्ता

एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 08
शिवसेना – 04
माकप – 03
भाजप – 01
अपक्ष – 01


अहमदनगरच्या अकोले नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता

भाजप – १२ जागेवर विजयी
काँग्रेस – १ जागेवरी विजयी
राष्ट्रवादी – २ जागेवर विजयी


सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये आघाडीची सत्ता, राणेंना धक्का

सिंधुदुर्गच्या कुडाळची सत्ता आघाडीने नारायण राणेंकडून हिसकावली आहे.

शिवसेना – ७ जागेवर विजय
काँग्रेस – २ जागेवर विजय
भाजप – ८ जागेवर विजय


रायगडच्या पोलादपूरवर शिवसेनेचा झेंडा

शिवसेना – १० जागांवर विजयी
राष्ट्रवादी आणि काँग्रेस – ६ जागांवर विजयी
भाजप – १ जागेवर विजयी


औरंगाबादच्या सोयगावमध्ये रावसाहेब दानवेंना धक्का. ११ पैकी ८ जागांवर शिवसेना विजयी


राज्यमंत्री विश्वजीत कदमांच्या कडेगाव नगरपंचायतीत भाजपचे कमळ फुलले आहे.

भाजप – १० जागेवर विजय
काँग्रेस – ६ जागेवर विजय


सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रभाग 16 अ चा निकाल,

महेंद्र चंडाले- 535
अमोल गवळी-  3434
सुरेश सावंत -587
तौफिक शिकलगार- 7429
उमरफारूक ककमरी :21
समीर सय्यद – 18

काँग्रेसचे तौफिक शिकलगार 3995 मतांनी विजयी


नाशिक : नगरपंचायत निवडणूक
सुरगाणा  – 17 जागा निकाल जाहिर
शिवसेना – ६ जागेवर विजय
भाजप – ०८ जागेवर विजय
माकप – ०२ जागेवर विजय
राष्ट्रवादी – ०१ जागेवर विजय


नगरपंचायतीचे नाव – निफाड
एकुण जागा – 17
शिवसेना- 07 जागेवर विजय
काँग्रेस-01 जागेवर विजय
राष्ट्रवादी-01 जागेवर विजय
शहर विकास आघाडी – 01 जागेवर विजय
बसपा- 01 जागेवर विजय
इतर(अपक्ष)-01 जागेवर विजय


देवगड – भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा शिरकाव सहा जागा पटकावल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर भाजपला पाच जागा मिळवल्या आहेत. संदेश पारकर यांनी एक हाती बालेकिल्ल्याच्या नेतृत्व करत आमदार नितेश राणे यांना धक्का दिला.


अमरावतीच्या तिवसा नगरपंचायतीत काँग्रेस विजयी झाली आहे.

काँग्रेस – १२ जागा विजयी
शिवसेना – ४ जागा विजयी
वंचित – १ जाग विजयी


संग्रामपूर नगरपंचायत बच्चू कडू यांच्या प्रहारची एकहाती सत्ता मिळवली आहे. बच्चू कडूंनी भाजपच्या संजय कुटेंची धोबीपछाड केली आहे. प्रहार जनशक्तीचा १२ जागांवर विजय मिळाला आहे.


साताऱ्याच्या पाटण नगरपंचायतीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना धक्का

पाटण नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात


अकोला नगरपंचायत

भाजप – ८ जागा विजयी
शिवसेना – २ जागा विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस – २ जागा विजयी


कवठे महांकाळ नगरपंचायतीत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा विजय. रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.

राष्ट्रवादी – १० जागेवर विजयी
शेतकरी विकास – ६ जागेवर विजयी
अपक्ष – १ जागेवर विजयी


परभणीतील पालम नगरपंचायतीमध्ये

राष्ट्रवादी – ५ जागेवर विजयी,
रासप – ३ जागेवर विजयी
अपक्ष – १ जागेवर विजयी


उस्मानाबाद वाशीम नगरपंचायत

भाजप – ३ जागेवर विजयी
शिवसेना – ४ जागेवर विजयी


देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता

राष्ट्रवादी – १३ जागेवर विजयी
भाजप – १ जागेवर विजयी
अपक्षा – २ जागेवर विजयी


रायगड खालापूरमध्ये शिवसेनेला ५, शेकाप २, राष्ट्रवादीला १ जागेवर विजय


रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादीला ४, शेकाप १ आणि इतरांना १ जागा मिळाली आहे.


नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना १३ जागांवर, काँग्रेस ३ जागांवर आणि भाजप एका जागेवर विजयी झाली आहे.


शिवसेनेच्या ताब्यात नंदुरबारमधील धडगाव नगरपंचायत


उस्मानाबाद वाशी नगरपंचायत निकालात भाजपला १ आणि शिवसेनाला २ जागा मिळवण्यात यश


कर्जत जामखेड नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांची सरशी, राम शिंदेंना पराभवाचा धक्का.


जालना तीर्थपुरी नगरपंचायतीत राष्ट्रवादीला ४, भाजप १, शिवसेना १ जागेवर विजय मिळाला आहे.


केज नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या हर्षदा यांच्या गळ्यात विजयाची माळ


वैभववाडी नगरपंचायतीमध्ये भाजप २ जागांवर तर शिवसेना १ जागेवर विजयी


पंढरपूरच्या माढा नगरपंचायतीत काँग्रेसला ५ जागांवर विजयी


धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीत भाजपला २ जागेवर विजय


सेलू नगरपंचायतीमध्ये भाजप १, काँग्रेस २, अपक्ष १ जागेवर विजयी


कारंजा नगरपंचायतीत भाजप चार जागी विजयी, समुद्रपूर नगरपंचायत भाजप १, बसपा १, राष्ट्रवादी १ जागेवर विजयी


अमरावतीत तिवसा नगरपंचायतीमध्ये काँग्रेस ४, शिवसेना आणि वंचितला प्रत्येकी १ जागेवर विजय


पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये ३ विक्रमगड विकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी


सोलापूरच्या वैरागमध्ये राष्ट्रवादीचे ३ उमेदवार विजयी


बीडमधील आष्टी नगरपंचायतीत ४ जागी भाजपचा विजय


शिरुर नगरपंचायत पहिल्या फेरीत भाजप ३ जागी विजयी


नाशिकच्या देवळा नगरपंचायती निकालात भाजप ६ आणि राष्ट्रवादी १ जागेवर विजयी


कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी ७ तर भाजप १ जागी विजयी


विश्वजीत कदमांच्या कडेगावात भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर. काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी ३ जागांवर विजय


नंदुरबारच्या धडगावात ६ जागेवर शिवसेना, २ जागेवारी काँग्रेस आणि १ जागेवर भाजप विजयी झाला आहे.


बुलढाणाच्या संग्रामपूरमध्ये प्रहार जनशक्तीच्या कविता तायडे ९ मतांनी विजयी झाल्या आहेत.


बीड जिल्ह्यातील पाटोदा नगरपंचायतीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर पाटोद्यात एका जागेवर अपक्षाचा विजय झाला आहे.


कुडाळमधून शिवसेनेच्या श्रृती वर्दम विजयी झाल्या आहेत. तसेच भाजपच्या नयना मांजरेकर विजयी झाल्या आहेत.


दापोली वॉर्ड क्रमांक २ मधून राष्ट्रवादीचे नौशिन गिलगिले विजयी झाले आहेत.


मतमोजणीच्या आधी नगरपंचायत निवडणुकीत १९ उमेदवार बिनविरोधी विजयी झाले आहेत. रायगडच्या तळा नगरंपचायतीत शिवसेनेच्या एका उमेदवाराची बिनविरोधी निवड झाली आहे. तर रायगड्या म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. तसेच नाशिकच्या कळवणमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. नाशिक-देवळा नगरपंचायतीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोधी विजय झाले आहेत. अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. जालन्याच्या बदनापूरमध्ये राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराची निवडण बिनविरोधी झाली आहे. जालन्याच्या मंठामध्ये शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. नांदेडच्या नायगावमध्ये काँग्रेस आणि भाजपला प्रत्येक दोन जागेवर विजय मिळाला आहे.


राज्यातील १०६ नगरपंचायती आणि २ जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला झाली सुरुवात


गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींची उद्या मतमोजणी होणार आहे. अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा, मुलचेरा, कुरखेडा निवडणूक झालेली आहे. अहेरीत अंबरीश आत्राम आणि धर्मरावबाब आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पण आता या सर्व नगरपंचायती मतमोजणी ही उद्या होणार आहे.


राज्यातील १०६ नगरपंचायतींच्या ३४४ अनारक्षित जागांचा आज निकाल लागणार आहे. तसेच भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार काल, मंगळवारी नगरपंचायतींसाठी सरासरी ८१ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील ९३ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी मंगळवारी सरासरी ८१ तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या २३ आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या ४५ जागांसाठी ७३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील ४ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तत्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार काल मतदान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -