घरमहाराष्ट्रAU प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी; भरत गोगावलेंकडून चौकशीची मागणी

AU प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी; भरत गोगावलेंकडून चौकशीची मागणी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालिअन मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशानातही पाहायला मिळाले. शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर ये एयू एयू कोन है? चे बॅनर झळकावत शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना एकप्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरून आज शिंदे गटाचे मंत्री भर गोगावले यांनी AU प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी झाल्याचा आरोप करत याप्रकरणी सरकारने चौकशी करण्याची मागणी केली. भरत गोगावले यांनी हा मुद्द्दा उपस्थित केला. ज्यानंतर शिंदे गट, भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली, भरत गोगावले यांच्यानंतर आमदार नितेश राणे या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला.

या मुद्द्यावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की, कालपासून आजपर्यंत गेली दोन दिवस दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जे एयू एयू प्रकरण गाजतय ते नेमक काय आहे? हे कळायला पाहिजे, यातून महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, त्यामुळे याची माहिती असणे गरजेचे आहे. हे एयू प्रकरण नेमक महाराष्ट्रातलं आहे? की दिल्लीतील आहे? नेमक काय आहे? याची कागद आमच्याकडे आली आहेत, या एयू प्रकरणाचा छडा लागायला पाहिजे. या प्रकरणाची चौकशी करून याचे उत्तर हवं आहे. सभागृहाला त्याची माहिती अवगत करुन द्यावी अशी विनंती भरत गोगावले यांनी केली आहे.

- Advertisement -

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला AU चे 44 फोन आले होते. बिहार पोलिसांनुसार, AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे हे असून CBI चौकशी वेगळेच सांगते. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य समोर यायला हवे’, अशी मागणी काल लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. या मुद्द्यावरून आज विधानसभेत भाजप आणि शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला.


ए फॉर आदित्य, ए फॉर आफताब; आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -