घरमहाराष्ट्रManipur violence : नीरो जसा बासरी वाजवीत बसला होता..., ठाकरे गटाचा मोदींवर...

Manipur violence : नीरो जसा बासरी वाजवीत बसला होता…, ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

Subscribe

मणिपूर हे राज्य मागील वर्षभर जातीय आणि वांशिक हिंसाचाराच्या वणव्यात जळत आहे. ईशान्य सीमेवरील अत्यंत संवेदनशील असलेले हे राज्य सलग काही महिने जळत असताना पंतप्रधान मोदी, त्यांचे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार काय करीत होते? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

मुंबई : देशात जे काही चांगले घडते ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच, असे त्यांचे भक्त नेहमीच सांगत असतात. मोदी स्वतःही तशीच प्रौढी मिरवत फिरत असतात. आताही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून ते हेच करीत आहेत. काय तर म्हणे, त्यांच्या सरकारमुळेच मणिपूर शांत झाले! आज मोदी ‘वेळीच हस्तक्षेप’ केल्याच्या बढाया मारीत असले तरी त्या संपूर्ण काळात मोदी सरकारची अवस्था ‘कळूनही वळत नाही’ अशीच होती. रोम जळत असताना नीरो जसा बासरी वाजवीत बसला होता, तसे पंतप्रधान मोदी मणिपूर जळत असताना एकतर मौन बाळगून होते, नाहीतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात मग्न होते, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

आसाममधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते असे म्हणाले की, ‘‘केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून मणिपूरमधील परिस्थितीत बरीच सुधारणा झाली.’’ पंतप्रधानांचा हा दावा म्हणजे कांगावा तर आहेच, परंतु हिंसाचारग्रस्त मणिपुरी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रकार आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sushma Andhare : राज ठाकरेंनी पावित्र्याची व्याख्या बदलली, सुषमा अंधारे यांचा टोला

मोदी यांच्यावर खोटारडेपणाचे आरोप सातत्याने का होतात, हे त्यांच्या या बेधडक दाव्यावरून लक्षात येते. मणिपूर हे राज्य मागील वर्षभर जातीय आणि वांशिक हिंसाचाराच्या वणव्यात जळत आहे. शेकडो निष्पाप लोकांचे बळी या हिंसाचाराने घेतले. हजारो कुटुंबे बेघर झाली. स्थलांतरित झाली. ईशान्य सीमेवरील अत्यंत संवेदनशील असलेले हे राज्य सलग काही महिने जळत असताना पंतप्रधान मोदी, त्यांचे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार काय करीत होते? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

अनेक मान्यवरांनी, विरोधी पक्षांनी त्या वेळी मणिपूरला भेट द्या, तेथील जनतेचे सांत्वन करा, तेही करत नसाल तर निदान काहीतरी बोला, असा रास्त आग्रह मोदी यांच्याकडे धरला होता, परंतु मोदी यांनी नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले. हिंसाचारात सर्वस्व गमावलेली मणिपुरी जनता आक्रोश करीत होती, हस्तक्षेपाची याचना करीत होती. ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम हिनेदेखील ‘‘आम्हाला वाचवा’’ असा टाहो मोदी यांच्याकडे फोडला होता. पण मोदींच्या कानाचे पडदे हलले नाहीत, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा पेच कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -