घरमहाराष्ट्रSushma Andhare : राज ठाकरेंनी पावित्र्याची व्याख्या बदलली, सुषमा अंधारे यांचा टोला

Sushma Andhare : राज ठाकरेंनी पावित्र्याची व्याख्या बदलली, सुषमा अंधारे यांचा टोला

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना पावित्र्याची व्याख्याच बदलल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी लगावला.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना पावित्र्याची व्याख्याच बदलल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी लगावला. राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेला पाठिंबा आमचा विश्वास वाढवणारा आहे. एकिकडे राजकीय व्यभिचाराला समर्थन नाही, असे म्हणताना तुम्ही ज्यांनी व्हाया सुरत, गुवाहाटी करत कूटनितीने खोक्याचे राजकारण करत इथे सरकार बदलवले या लोकांना पावित्र्याच्या कोणत्या व्याख्येत बसवता? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. (Sushma Andhare criticizes Raj Thackeray)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मंगळवारी (ता. 09 एप्रिल) गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आज प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना अंधारे यांनी या निर्णयावरून मनसेवर निशाणा साधला. एकीकडे व्यभिचाराची भाषा करता आणि दुसरीकडे पावित्र्याचा दर्जा बदलता, असा टोला लगावत त्यांनी राज ठाकरे यांचा हा निर्णय संविधानप्रेमी महाराष्ट्रातील जनतेला पटणार नसल्याचे सांगिलते.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा पेच कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

तर, महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा आमच्यावर काही परिणाम होईल किंवा आम्ही खचून जाऊ असे काहीच नाही. हा पाठिंबा आमचा विश्वास वाढवणारा असून, 84 वर्षीय वयोवृद्ध योद्ध्याला आणि एका घायाळ वाघाला हरवण्यासाठी इतकी मोठी ताकद लावतात त्या अर्थी त्यांना अजूनही महाराष्ट्रात आपण जिंकू अशी खात्री वाटत नाही. त्यामुळेच मते वळवण्यासाठी म्हणून महायुतीने राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळवल्याचे संकेत यामाध्यमातून दिल्याचेही सुषमा अंधारे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष जर खरी शिवसेना असती, तर त्यांनी लागलीच उमेदवार घोषित केले असते. ज्या माणसाला इतरांचे सोडा पण स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करण्याचेही भाग्य मिळू नये त्यांच्याबद्दल असली आणि नकली असा वाद घालायचा प्रश्नच येत नाही, या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांच्या या टीकेला महायुतीच्या नेत्यांकडून काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… Raj Thackeray : बुडत्याला डुबत्याचा आधार… ठाकरे गटाचा राज ठाकरेंवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -