Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर ‘हा' आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप

‘हा’ आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप

Subscribe

वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता आणखी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. राज्यात रोजगार उपलब्ध करणारे हे दोन प्रकल्प बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी विशेषत: शिवसेनेने सत्ताधारी शिंदे गटावर हल्ला चढवला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला.

वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता आणखी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. राज्यात रोजगार उपलब्ध करणारे हे दोन प्रकल्प बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी विशेषत: शिवसेनेने सत्ताधारी शिंदे गटावर हल्ला चढवला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर राज्यात विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. मात्र, या दोन प्रकल्पांनंतर महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प बाहेर गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (Medicine device project also going from maharashtra shiv sena leader aaditya thackeray serious allegations on cm eknath shinde)

आदित्य ठाकरे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप शिंदे फडणवीससरकारवर केला आहे. औरंगाबाद येथे प्रस्तावित असणारा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. महाराष्ट्राला मेडिसीन डिव्हाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी वेंदाता महाराष्ट्राबाहेर गेला. ऑरिक सिटीतील प्रकल्प राज्याबाहेर गेला. मेडिसीन डिव्हाइस पार्क राज्याबाहेर गेला आहे. या प्रकल्पांबाबत राज्य सरकारला याची माहिती आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

- Advertisement -

मेडिसीन डिव्हाइस पार्क इतर राज्यात गेलेला आहे. त्या प्रकल्पांसाठी अनुदान देखील जारी करण्यात आले आहे. राज्य सरकराने या प्रकल्पाबद्दल माहिती देखील राज्यातील तरुणांना दिलेली नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बिडकीनमध्ये होणारा मेडिकल डिव्हाइस पार्क राज्याबाहेर गेल्याच्या विरोधात पुढचे जनआक्रोश आंदोलन संभाजीनगरमध्ये करणार असल्याचे म्हटले.

शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मार्च महिन्यात केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील मेडिसीन डिव्हाइस पार्कला अनुदान देण्याचा मुद्दा पस्थित केला होता. आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार नसल्याचं पत्र दिल्याची माहिती चतुर्वेदी यांनी केली.


- Advertisement -

हेही वाचा – ‘चलो अॅप’वर बेस्ट प्रवाशांना 19 रुपयांच्या तिकिटात मिळणार 9 बसफेऱ्यांची मुभा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -