घरताज्या घडामोडीकिरीट सोमय्यांनी बिल्डर्सकडून सुपारी घेतलीय; अनिल परबांचा आरोप

किरीट सोमय्यांनी बिल्डर्सकडून सुपारी घेतलीय; अनिल परबांचा आरोप

Subscribe

वांद्र्याच्या म्हाडा कॉलनमधील ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दावा केला. त्यावर आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले.

वांद्र्याच्या म्हाडा कॉलनमधील ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दावा केला. त्यावर आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘किरीट सोमय्यांनी मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचं नाही, त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही हे धोरण ठरवत बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे’, असा आरोप अनिल परब यांनी केला. तसेच, किरीट सोमय्या जे करत आहेत, त्याला भाजपाचं समर्थन आहे का? असा सवालही अनिल परब यांनी विचारला. (MLA Anil Parab Slams bjp leader kirit somaiya)

“गरीब मराठी माणूस या विभागात राहतो. त्यांची ही जागा आहे. ही जागा सोसायटीची आहे. म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत ज्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. त्यात अशा प्रकारची ऑर्डर येणं आणि लोकांना मूळ घरं २२० स्क्वेअर फूटचीच घरं द्यायची या हेतून किरीट सोमय्यांना बिल्डर्संकडून सुपारी घेतली असावी” असा आरोप अनिल परब यांनी केला. “आज प्रत्येकाच्या मनात ही भीती आहे की या ऑर्डरचा फायदा घेऊन ब्लॅकमेल केलं जाईल असं वाटतं आहे. आम्ही म्हाडालाही याबाबतचा जाब विचारणार आहोत. २० वर्षांपूर्वीचे एक प्रकरण अजून म्हाडाकडे पेंडिंग आहे”, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पुढे अनिल परब म्हणाले की, “किरीट सोमय्या यांना माझे आव्हान आहे की, नारायण राणेंचे घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. माझ्यासोबत किरीट सोमय्या ती तोडक कारवाई बघायला येणार का? मी म्हाडाला जागा मोकळी केल्याचे पत्रही दिले आहे. किरीट सोमय्या कोण आहेत? म्हाडाचे अधिकारी आहेत का? ते इथे का येणार आहेत? आम्ही किरीट सोमय्यांना आव्हान देतो, की हिंमत असेल तर या इकडे तुमचे स्वागत करायला आम्ही तयार आहोत. गरीब कुटुंबाचं नुकसान कुणी करणार असेल तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही. गरीबांच्या पोटावर भाजपा आणि किरीट सोमय्या येणार असतील आम्ही कुणीही शांत बसणार नाही. मी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही भेटणार आहे”, असेही अनिल परब यांनी सांगितले.


हेही वाचा – कार्यालय नियमित न करण्यासाठी किरीट सोमय्यांनी म्हाडावर दबाव टाकला; अनिल परबांचा आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -