घरताज्या घडामोडीभाजपला मतदान करू नये, यासाठी अटकेचा प्रयत्न; आमदार रवी राणांचा आरोप

भाजपला मतदान करू नये, यासाठी अटकेचा प्रयत्न; आमदार रवी राणांचा आरोप

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य विरूद्ध राज्य सरकार हा संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अमरावतीचे महापालिका आयुक्त यांच्यावरील शाईफेक प्रकरणात हे वॉरंट काढण्यात आलं आहे. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. मी भाजपला मतदान करू नये, यासाठी मविआने मला अटक करण्यासाठी मुंबई आणि अमरावती पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी पाठवले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर अमरावतीचे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील निवासस्थानी पोहोचले, पण ते त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे मला अटक करू शकले नाहीत. परंतु यावर आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ, असं रवी राणा म्हणाले.

- Advertisement -

रवी राणा यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. राजापेठ पोलीस शनिवारी रवी राणा यांच्या मुंबईतील घरी वॉरंट घेऊन पोहोचले होते. त्यावेळी रवी राणा तेथे उपस्थित नव्हते. कारण राणा दाम्पत्य सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत.

रवी राणा यांच्यावर आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणात कलम ३५३, ३०७ या कलमांतर्गत राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जामीनपत्र वॉरंट कोर्टाकडून काढण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील तारखेला राणांना कोर्टामध्ये हजर रहावे लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मागील काही दिवसांपासून हे शाईफेकीचे प्रकरण सुरू असून हा वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रवी राणांची पुढची भूमिका काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महापालिकेचा निकाल राज्यसभेप्रमाणेच लागणार; मुंबईची कन्या म्हणून नवनीत राणा भाजपचा प्रचार करणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -