घरताज्या घडामोडीराणा दाम्पत्य 'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करणार, २२ एप्रिलला ५०० कार्यकर्त्यांसह मुंबईत...

राणा दाम्पत्य ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करणार, २२ एप्रिलला ५०० कार्यकर्त्यांसह मुंबईत होणार दाखल

Subscribe

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा पठण करावं अन्यथा आम्ही मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असे आव्हानच राणा दाम्पत्याने केले होते. यानंतर शिवसैनिकांनी राणा कुटुंबियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. आता आमदार रवी राणा यांनी आपण २२ एप्रिलला मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणार असल्याचे जाहीर केलं आहे. आमदार राणा ५०० कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल होतील आणि २३ एप्रिलला हनुमान चालिसा पठण होणार असल्याची माहिती आमदार राणा यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठण करणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले होते. परंतु राणा दाम्पत्य आले नव्हते. यावेळी आमदार रवी राणा यांनी तारीख जाहीर केल्यामुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शांततेत हनुमान चालिसा पठण करणार – रवी राणा

आमदार रवी राणा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा मुहूर्त सांगितला आहे. हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसा पठण करण्याची विनंती केली होती. कारण जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून महाराष्ट्रात संकट येत आहे. महाराष्ट्र त्रस्त आहे. त्यासाठी जे बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसाचे वाचन करावे परंतु मुख्यमंत्र्यांनी वाचन केलं नाही. २२ तारखेला अमरावतीमधून निघणार आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचू तसेच शांततापूर्ण ज्या प्रमाणे पंढरपूरची वारी असते त्याप्रमाणे हनुमान चालिसा पठण करण्यासाठी वारी काढू, कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. महाराष्ट्राच्या सुख आणि शांतीसाठी प्रार्थना करणार आहोत असे आमदार रवी राणा म्हणाले आहेत.

दरम्यान, मला आश्चर्य वाटतंय की, शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढा विरोध का करत आहेत. हनुमान चालिसा पठण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची परवानगी घ्यावी लागेल का? आज हिंदूंच्या नावावर मत गोळा करतो सत्तेवर बसतो मग हनुमान चालिसा म्हणण्यासाठी एवढा विरोध का? असा सवाल आमदार रवी राणा यांनी केला आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्यास सांगितले असते. असे रवी राणा म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : राज ठाकरेंसह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावणार, दिलीप वळसे-पाटलांची माहिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -