घरमहाराष्ट्रMMRCला मेट्रो 3 स्थानकांच्या नावांच्या अधिकारातून 200 कोटींहून अधिकचा महसूल मिळणार

MMRCला मेट्रो 3 स्थानकांच्या नावांच्या अधिकारातून 200 कोटींहून अधिकचा महसूल मिळणार

Subscribe

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशनचे अधिकार देण्यात आले आहेत, तर आयसीआयसीआय लोम्बार्डला सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आणि आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) चे अधिकार देण्यात आलेत

मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या मेट्रो-3 मार्गावरील पाच स्थानकांच्या नामकरणाचे अधिकार विविध नामांकित कंपन्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेला ‘नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यू’च्या माध्यमातून वार्षिक 40 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. मेट्रो-3 सुरू झाल्यानंतर पुढील 5 वर्षांत ‘नाम’ प्राधिकरणाद्वारे 5% वाढीसह एकूण 216 कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत.

या अंतर्गत कोटक महिंद्रा बँकेला वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशनचे अधिकार देण्यात आले आहेत, तर आयसीआयसीआय लोम्बार्डला सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आणि आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) चे अधिकार देण्यात आलेत. चर्चगेट आणि हुतात्मा चौक मेट्रोचे अधिकार, स्थानकांना नावे ठेवण्याचे अधिकार देण्यात आलेत. या अंतर्गत अशा कंपन्यांना ब्रँडिंगसाठी जागा मिळेल आणि या कंपन्यांची नावे ट्रेनच्या घोषणा आणि स्थानकाच्या नकाशांमध्ये नमूद केली जातील. तसेच संबंधित स्थानकाच्या नावापुढे त्या कंपन्यांचे नाव जोडले जाणार आहे. स्थानकाच्या नावाच्या हक्कांसाठी कोटक महिंद्रा बँक, LIC आणि ICICI यांसारख्या नामांकित कंपन्यांशी टायअप करणे आनंददायी असल्याचा MMRCचा दावा आहे. तसेच सल्लागार – स्टुडिओ पीओडी कन्सोर्टियमने या प्रक्रियेसाठी सल्लागार म्हणून काम केले. उर्वरित स्थानकांसाठी नामकरण अधिकाराच्या निविदा मेट्रो-3 सुरू होण्यापूर्वी (ROD) नियोजित/आमंत्रित केल्या आहेत.

- Advertisement -

जगातील सर्वाधिक कमाई करणारी मेट्रो 3 ची स्थानके

“हे नॉन फेअर बॉक्स महसूल निर्माण करण्यासाठी, निधी सुलभ करण्यासाठी आणि तिकीट शुल्क वाजवी ठेवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. मेट्रो-3 स्थानकांवरून प्रति स्टेशन वार्षिक सरासरी 8 कोटी रुपये उत्पन्न मिळेल. ही किंमत भारतातील सर्वात जास्त आहे आणि आतापर्यंत जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मेट्रो स्थानकांपैकी एक आहे. दुबई, माद्रिद, जकार्ता, क्वालालंपूर मेट्रो स्टेशन्सची सरासरी वार्षिक कमाई प्रति स्टेशन 10 लाख आहे.

– अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, MMRC

- Advertisement -

हेही वाचाः मोठी बातमी! दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -