राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे, सावरकरांवर बोलायची लायकी आहे का?, राज ठाकरेंचा हल्लाबोल

राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. ते बोलतात तेव्हा मागून आरडी बर्मन बोलतात का असं वाटतं. सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का?, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. ते बोलतात तेव्हा मागून आरडी बर्मन बोलतात का असं वाटतं. सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का?, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. मुंबईतील नेस्को मैदानात मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. (mns leader raj thackeray targets congress rahul gandhi over savarkar comment)

मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात भाष्य करताना राज ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. “राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. ते बोलतात तेव्हा मागून आरडी बर्मन बोलतात का असं वाटतं. सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का? कोण आहेत माहिती आहे का? कुठे ठेवलं होतं, काय हाल सहन केले. एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते. आम्ही त्याचा विचार करत नाही. फक्त बोलणार दयेचा अर्ज केला. सर सलामत तो पगडी पचास”, असे म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

“आमची कृष्ण निती काय सांगते. चांगली गोष्ट जर घडणार असेल, त्यासाठी खोटे बोलावे लागले तर बोला, पण ती गोष्ट होणे गरजेचे आहे. ज्याला स्ट्रॅटजी समजत नाही तो गुळगुळीत मेंदूचा. सगळ्या गोष्टी थांबणे आवश्यक आहे. काँग्रेसला जसे सांगणे आहे तसे भाजप आणि अन्य लोकांनाही सांगणे आहे. दोन्ही बाजूने आमच्या सर्व लोकांना, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, महापुरूष म्हटले गेले, आयकॉन झाले, यांची बदनामी करून हाती काय लागणारे? असा सवालही त्यांनी केला. या देशासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. अनेक मोहल्ले उभे राहतायत त्यातला सुरक्षेचा प्रश्न गांभीर्यानं ने घेता आम्ही एकमेकांची बदनामी करतोय”, असेही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले.