प्रवाशांना मोबाईल अॅपद्वारे करता येणार रिक्षा, टॅक्सी चालकांची तक्रार; मनमानी कारभाराला बसणार चाप

रिक्षा व टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच चालकांच्या मनमानी कारभाराचा सामना करावा लागतो. प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होतात. या वादातून आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आता मोबाईल अॅपची निर्मिती केली जाणार आहे.

Rickshaw And Taxi

रिक्षा व टॅक्सीने (Rickshaw and Taxi) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच चालकांच्या मनमानी कारभाराचा सामना करावा लागतो. प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होतात. या वादातून आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आता मोबाईल अॅपची (Mobile App) निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे चालकांच्या मनमानी कारभाराला आळा बसविण्यासाठी आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी परिवहन विभागाने (Transport Department) तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. (mobile app for complaint of rickshaw and taxi driver)

मोबाईल अ‍ॅपची सुविधा या प्रणालीत असून, परिवहन आयुक्त कार्यालय सध्या त्यावर काम सुरू आहे. लवकरच हे अॅप प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मिळते. प्रवाशांबरोबरच वाहन चालकांना येणाऱ्या अडचणींची नोंद या अ‍ॅप करता येणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी घेतानाच वाहन चालकांना परवाना, लायसन्स (अनुज्ञप्ती) व वाहन सेवेबाबात येणाऱ्या समस्या यावर नोंदविता येणार आहेत.

मनमानी कारभार करणाऱ्या वाहनचालकाच्या वाहनाचे आणि वाहन क्रमांकाचे छायाचित्र पाठविल्यास त्याची त्वरित संबंधित आरटीओकडून दखल घेण्यात येणार आहे. तसेच, संबंधितांवर करण्यात येणार आहे.

परिवहन विभागाने मोबाइल अ‍ॅपची सुविधा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाइल अ‍ॅपची सुविधा २०१७ मध्ये सेवेत होती. तांत्रिक कारणास्तव ही सेवा २०२० मध्ये बंद पडली. या ॲपचे काम महाआयटीकडे सोपविण्यात आले आहे.

असे काम करेल मोबाईल अ‍ॅप

  • प्रवासी आणि वाहनचालकांना मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात येईल.
  • त्यात संबंधितां माहिती नोंदवावी लागेल.
  • अ‍ॅपमध्ये छायाचित्र काढण्याची व ते अपलोड करण्याची सुविधा असेल.
  • यामध्ये तक्रारींचे पर्याय असतील. ते निवडावे लागतील.
  • अॅपवर सर्व माहिती नोंदविल्यानंतर राज्यातील संबंधित आरटीओला ती कळेल व तक्रारीची दखल घेतली जाईल.
  • दखल घेऊन त्यावर केलेली कार्यवाही प्रवासी किवा वाहन चालकाला समजेल.

हेही वाचा – व्हिपचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात याचिका दाखल करता येऊ शकते – देवेंद्र फडणवीस