घरमहाराष्ट्रमुंडे भगिनींच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरुच; पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे लक्ष

मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरुच; पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे लक्ष

Subscribe

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे डावलण्याचे पडसाद बीडमध्ये उमटत आहेत. मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून हे राजीनामा सत्र सुरुच आहे. आतापर्यंत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे ७४ राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीसह ३ सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. राजीनामा सत्र सुरु असताना पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, एकीकडे राजीनामा सत्र सुरु असताना पंकजा मुंडे काल रविवारी दिल्लीत होत्या. तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींच्या भेटीनंतर पंकजा मुंडे लवकरच समर्थकांना भेटणार असणार असून पंकजा मुंडे समर्थकांची समजूत काढण्यात यश येणार का? तसंच पंकजा यांचं पुढचं राजकीय पाऊल काय असणार? असे प्रश्न उपस्थित झाले असून या प्रश्नांची उत्तरं देखील पंकजा मुंडेच देतील.

- Advertisement -

प्रीतम मुंडेंना डावलून भागवत कराडांना संधी

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असे अंदाज बांधले जात होते. मात्र, ते अंदाज फोल ठरले. प्रीतम मुंडेंना डावलून अनपेक्षितपणे भागवत कराड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. मात्र दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना संधी का दिली गेली? यावर अनेक तर्क लावले जात आहे. भाजपचं अंतर्गत राजकारणाचीही यावरुन चर्चा रंगत आहे. त्यात भागवत कराड हे मुंडे कुंटुबियांचे निकटवर्तीय मानले जातात.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -