घरमहाराष्ट्रराणे, कपिल पाटील, भारती पवार हे राष्ट्रवादी-शिवसेनेचे प्रॉडक्ट; राऊतांची खोचक प्रतिक्रिया

राणे, कपिल पाटील, भारती पवार हे राष्ट्रवादी-शिवसेनेचे प्रॉडक्ट; राऊतांची खोचक प्रतिक्रिया

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला. यात राज्यातील चार नेत्यांना मंत्रीपद देण्यात आलं. यामध्ये खासदार नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार आणि डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. कराड सोडले तर इतर तीनही नेते दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक प्रतिक्रिया दिली.

“मंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार…त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. ज्या परिस्थितीतून देश चालला आहे. महागाई असेल, आर्थिक विषय असतील, आरोग्य विषयक आणीबाणी असो, बेरोजगारी आहे, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर जबाबादारी आलेली आहे. मोदींनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसलेले आहेत. ते बरोबर आहे
महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रीपदं आलेली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडलेला आहे. अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला. नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खातं त्यांना दिलं. खरंतर नारायण राणे यांची कामाची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अनेकदा मंत्री होते, अनेक मंत्रीपदं त्यांनी सांभाळली आहेत.
पण त्यांना आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खातं दिलं आहे. महाराष्ट्र आणि देशामध्ये या माध्यमातून मोदींना जी काही अपेक्षा आहे, विशेषत: रोजगार वाढवण्याचं, हे एक मोठं आव्हान त्यांच्यापुढे आहे. पण एकमात्र, भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत, आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला आहे, मंत्रिमंडळामध्ये चेहरे मिळाले. कपिल पाटील आणि भारती पवार राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहेत. नारायण राणे शिवसेना काँग्रेस करत भाजपमध्ये गेले आहेत. हे पाहिल्यावरती मुळ चेहरा मंत्रिमंडळाचा पूर्णपणे राष्ट्रवादी शिवसेनेचाच आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

- Advertisement -

“केंद्रात पाहीलं, केंद्रात सुद्धा अनेक जुने जाणेत बाजूला आहेत. बाहेरुन आलेली अनेक प्रमुख लोकं आहेत, ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत, पण ते त्यांच्यामध्ये सक्षमता पाहून दिलं असावं. नविन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान द्यावं. विशेषत: आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, नारायण राणे यांच्या रोजगार निर्माण करण्याची, लहान उद्योगांना जो पूर्णपणे या काळामध्ये मरुन पडला आहे, त्यांना संजिवनी देण्याचं काम राणेंनी करावं,” असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -