घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, खासदार संजय राऊतांचा विश्वास

महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, खासदार संजय राऊतांचा विश्वास

Subscribe

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज पीएमएलए कोर्टाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. १०२ दिवसानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जेलमधून सुटका झाल्यानंतर राऊत आपल्या भांडुपमधील निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले की, मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे मी माघार घेतली नाही तर मी लढत राहिलो. महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहिली. उद्यापासून मी खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहे. १०० दिवसानंतर तुम्ही माझं स्मरण ठेवलंत. १०० दिवसानंतर मी येथे आलो आहे. माझ्या सुटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. या महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो, ते संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलंय. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मागील तीन महिन्यांपासून तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ती तुटलेली नाही. शिवसेना काय आहे हे अंधेरीच्या पोटनिवडणुकीने दाखवून दिलं. मशाल फडकलेली आहे. मला अटक करून त्यांनी किती मोठी चूक केली हे त्यांना आठवेल. देशाच्या राजकारणात संजय राऊतांना अटक करून तुम्ही सर्वात मोठी चूक केली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

न्यायालयाने सांगितलं की, संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांचा कोणताही गुन्हा नाही. मला कितीही वेळा अटक करा, मी शिवसेनेला त्यागणार नाही आणि भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलो आणि भगवा घेऊन मी जाईन. हा बाळासाहेब ठाकरेंनी मला मंत्र दिला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

या महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आणि तो आपला शिवसैनिक असणार आहे. मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही. महाराष्ट्रातले बोके खोक्यावर बसलेले आहेत. गद्दारांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा हक्का नाही. जेव्हा मी तारखेला कोर्टात येत होतो तेव्हा प्रत्येक शिवसैनिक मला भेट होते. हे प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्याच शिवसेनेचं आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, संजय राऊत यांची अटक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपला बाजूला ठेवून महाविकास आघाडी स्थापन करणे, राज्यात आघाडीचे सरकार आणणे आणि उद्धव  ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसविणे यामध्ये संजय राऊत यांची भूमिका महत्वाची होती. आघाडी सरकारवर होणाऱ्या प्रत्येक आरोपांना संजय राऊत उत्तर देत होते. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक शीर्षस्थ नेत्यांवर टीका करण्यात राऊत आघाडीवर होते. शिवसेनेत जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हाही संजय राऊत यांनी एकहाती खिंड लढवली होती. मात्र, पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली. या कारवाईने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकप्रकारे आवाजच बंद झाला होता. संजय राऊत यांच्या गैरहजेरीत अरविंद सावंत, भास्कर जाधव, किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे, सुषमा अंधारे आदींनी शिवसेनेची बाजू मांडली.


हेही वाचा : घर ते तुरुंगापर्यंत राऊतांसोबत सावलीसारखे वावरणारे ते ‘संजय’ कोण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -