Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पवारांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतात - खासदार संजय...

पवारांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतात – खासदार संजय राऊत

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. या संदर्भात सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून बैठका सुरू आहेत. दरम्यान, पवारांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतात, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जारी केला आहे. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाहीये. शरद पवार यांच्यासारखे नेते समाजकारणातून आणि राजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत. परंतु हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे. तसेच त्यांच्या पक्षांतर्गत निर्णयावर शिवसेनेनं भाष्य करणं योग्य नाही. देशाला आणि महाराष्ट्राला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. अनेक वर्ष त्यांनी राज्याला आणि देशाला नेतृत्वं दिलं आणि ते यापुढेही देत राहतील, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

एखाद्या पदावरून निवृत्त होणं म्हणजे राजकारणातून आणि समाजकारणातून दूर होणं असं नाही. त्यांच्या पक्षामध्ये या अंतर्गत बैठका सुरू आहेत. या सर्व घडामोडी अचानक घडू लागल्या असल्या तरी त्यामध्ये अनपेक्षित असं काही नाही, असं मला वाटतंय. पवारांनी घेतलेला निर्णय हा कोणत्या परिस्थितीवरून घेतला आणि का घेतला?, याचं विश्लेषण तेच करू शकतात. परंतु त्यांच्यामागे त्यांचे कार्यकर्ते आणि पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

१९९० च्या दरम्यान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पक्षातील, राज्यातील आणि महाराष्ट्रातील काही घडामोडींचा त्यांना उबग आला. त्यातून त्यांनी तो राजीनामा दिला होता. परंतु शिवसैनिकांचा रेटा इतका अफाट होता की, काही दिवसांनी त्यांना आपला राजीनामा परत घ्यावा लागला. त्या सर्व प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. असा निर्णय एका विशिष्ट प्रसंगी घेतात, त्याचप्रमाणे शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे. आज त्यांच्याच पक्षाच्या बैठका सुरू आहे. त्यांचाच पक्ष हा या पदावरून दूर होतोय. परंतु त्याचा परिणाम मविआवर होणार नाही. मात्र, त्यांच्यासोबत आमचं बोलणं सुरू आहे, असंही संजय राऊत म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा : पवारांचा हा वैयक्तिक निर्णय, मला कल्पनाही नव्हती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 

- Advertisment -