घरमहाराष्ट्रकोरोनामुळे MPSCच्या परीक्षा लांबणीवर; राज्य सेवा आयोगाचा निर्णय

कोरोनामुळे MPSCच्या परीक्षा लांबणीवर; राज्य सेवा आयोगाचा निर्णय

Subscribe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC एप्रिल आणि मे महिन्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षा अनिश्चीत काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना आटोक्यात येण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC एप्रिल आणि मे महिन्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षा अनिश्चीत काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहे. यासंदर्भातील सूचना राज्य सरकारने दिल्या असून येत्या २६ एप्रिल रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि १० मे रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यमसेवा अराजपत्रित पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

तसेच उमेदवारांना परीक्षेची पुढील तारीख एसएमएसद्वारे कळवण्यात येणार असल्याचेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे. उमेदावारांनीही वेळोवेळी आयोगाची अधिकृत वेबसाईट बघावी असंही आयोगाने म्हटले आहे. एमपीएससीची पूर्वपरिक्षा ४ एप्रिल रोजी होणार होती. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ही परीक्षा पुढे ढकलून २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र आता २६ एप्रिल रोजी घेण्यात येणारी पुर्वपरिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


लॉकडाऊनचा कालावधी वाढणार, शाळा, महाविद्यालय जूनपर्यंत बंद
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -