घरमहाराष्ट्रग्रँट रोड येथे 40 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू, एक जण...

ग्रँट रोड येथे 40 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

Subscribe

मिळालेल्या महितीनुसार, ग्रँट रोड, बलराम स्ट्रीट येथे तळमजला अधिक 40 मजली सिद्धिज्योती ही इमारत आहे. या इमारतीमध्ये सोमवारी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना थेट 40 व्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळली.

मुंबई : मुंबई शहर भागातील ग्रँट रोड, बलराम स्ट्रीट येथे सोमवारी सायंकाळी सिद्धिज्योती या इमारतीमध्ये 40 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत सूर्यकांत राजीव पुजारी (43) या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर अनुभव त्रिपाठी (26) ही व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेने ग्रँट रोड परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेबाबत पोलीस, अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या महितीनुसार, ग्रँट रोड, बलराम स्ट्रीट येथे तळमजला अधिक 40 मजली सिद्धिज्योती ही इमारत आहे. या इमारतीमध्ये सोमवारी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना थेट 40 व्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळली. त्यामुळे इमारतीमध्ये मोठा आवाज झाला. नेमके काय घडले याबाबत प्रारंभी माहिती नसलेले रहिवाशी काहीसे भयभीत झाले होते. त्यानंतर काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली. याचवेळी अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले.

- Advertisement -

त्यानंतर अथक प्रयत्नांनी या लिफ्ट दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढून तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी एक गंभीर जखमी सूर्यकांत पुजारी (43) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे जी. टी. रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर दुसरा जखमी अनुभव त्रिपाठी (26) याला एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


हेही वाचाः प्रवीण चव्हाण स्टिंग ऑपरेशनची CID चौकशी; CBI चौकशीला नकार, भाजपचा सभात्याग  

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -