घरमहाराष्ट्रमुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पुष्पा गणेडीवालांचा राजीनामा

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पुष्पा गणेडीवालांचा राजीनामा

Subscribe

त्या 2007 साली जिल्हा न्यायाधीश होत्या. 13 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशाचा दोन वर्षांसाठी कार्यभार मिळाला. 'स्किन टू स्किन टच' या वादग्रस्त निर्णयामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी दिलेला निर्णय रद्द ठरविला होता. विशेष म्हणजे या निर्णयामुळे त्या सोशल मीडियावरही चर्चेत आल्या होत्या.

मुंबईः मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पुष्पा गणेडीवालांनी राजीनामा दिलाय. न्यायाधीश पुष्पा गणेडीवाल या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यरत होत्या. तसेच त्या मुंबईत उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश होत्या. त्यांचा कार्यकाळ 12 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. त्यांची मुंबई उच्च न्यायालयात यापुढे न्यायाधीश म्हणून नियुक्ती राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमनं शिफारस केली नाही. त्यामुळे त्यांनी अखेर राजीनामा दिलाय.

त्या 2007 साली जिल्हा न्यायाधीश होत्या. 13 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशाचा दोन वर्षांसाठी कार्यभार मिळाला. ‘स्किन टू स्किन टच’ या वादग्रस्त निर्णयामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी दिलेला निर्णय रद्द ठरविला होता. विशेष म्हणजे या निर्णयामुळे त्या सोशल मीडियावरही चर्चेत आल्या होत्या.

- Advertisement -

नेमकं काय होतं प्रकरण?

एका 12 वर्षीय मुलीच्या छातीला स्पर्श करणाऱ्या 39 वर्षीय आरोपीला त्वचेला प्रत्यक्ष स्पर्श न झाल्याचे सांगत ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत असलेल्या शिक्षेतून मुक्त करणारा निर्णय न्यायाधीश असलेल्या गणेडीवाला यांनी 19 जानेवारीला दिला होता. या आरोपीवर फक्त विनयभंगाचे आरोप लावता येतील, असा निकाल त्यांनी दिला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपालांनी न्यायाधीश गणेडीवालांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात विरोध केला होता. तसेच त्यांनी दिलेला निर्णय अत्यंत विचित्र असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे एक धोकादायक पायंडा पडण्याची भीती के. के. वेणुगोपाल यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा हा निर्णय रद्द केला.


या निकालापूर्वी म्हणजे 15 जानेवारी 2021 रोजी गणेडीवाला यांनी बाल लैंगिक शोषण प्रकरणी आणखी एक विचित्र निर्णय दिला होता. एखाद्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर पँटची झिप उघडणं पॉक्सो कायद्यांतर्गत यौन शोषण नाही. तर भादंवि कलम 354 अ अंतर्गत लैंगिक छळ आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

- Advertisement -

हेही वाचाः …अन् आदित्य ठाकरेंकडून अजितदादांसाठी स्टेअरिंग हातात घेत गाडीचं सारथ्य

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -