घरक्राइममुंबई गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकाला अटक

मुंबई गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकाला अटक

Subscribe

मुंबईत गतिमंद अल्पवयीन मलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्काराप्रकरणी पोलिसांना एकाला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती मिळते.

मुंबईत गतिमंद अल्पवयीन मलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्काराप्रकरणी पोलिसांना एकाला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती मिळते. मंगळवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Mumbai One man arrested for allegedly raping a mentally challenged minor girl)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मंगळवारी गतिमंद अल्पवयीन मलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मुंबईतील एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 376 (बलात्कार) आणि 34 (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

सोमवारी मुंबईत एका 34 वर्षीय भावाने 14 वर्षीय चुलत बहिणीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे तिच्या नातेवाईकाच्या 34 वर्षीय भावाने पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण नेरळ पोलिस स्टेशनकडे सोपवले आहे. संबंधित आरोपी फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

यापूर्वी मुंबईतच एका पंचतारांकित हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याच्या वरिष्ठ साथीदारावर बलात्कार केला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी काही दिवसांपासून तिला धमकावून तिचा लैंगिक छळ करत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – गुगलवर पुन्हा एकदा कारवाई; 936 कोटींचा ठोठावला दंड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -