घरमहाराष्ट्रआज एक्स्प्रेस-वे राहणार बंद!

आज एक्स्प्रेस-वे राहणार बंद!

Subscribe

आज मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग दोन तासासाठी बंद राहणार असून या दरम्यान पर्यायी महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आज मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग बंद राहणार आहे. या महामार्गावर सूचना फलक लावले जाणार असल्याने शुक्रवारी दुपारी महामार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सायन पनवेल येथून सुरु होणाऱ्या द्रुतगती महामार्गावर न जाता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग हा सायन – पनवेल महामार्गावरुन सुरु होतो. हा महामार्ग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही किलोमीटरवर शेडुंग फाटा लागतो. मात्र, या शेडुंग फाट्याजवळ सूचना फलक नसल्यामुळे या महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सूचना फलक लावण्याचे ठरवले असून त्याकरता या महामार्गावरील वाहतूक आज दोन तास बंद राहणार आहे. ओव्हरहेड गँन्ट्री प्रकारचे काम असल्यामुळे सूचना फलक लावण्यासाठी वाहने बंद करावी लागणार आहेत. हे काम दोन तासांत पूर्ण करून महामार्ग पुन्हा सुरळीत करण्याचे लक्ष्य रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलिसांनी ठेवले आहे.

- Advertisement -

पर्यायी मार्ग

शुक्रवारी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान, हे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे या कालावधीत खालापूरपर्यंतचा प्रवास वाहनांना द्रुतगती मार्गावरून करता येणार नाही. त्यामुळे वाहनांनी कळंबोली सर्कल येथून जुनामुंबई पुणे महामार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असा करु शकता प्रवास

कळंबोली सर्कल येथून डी पॉइंटमार्गे पळस्पे फाटा, पनवेलमधून पळस्पे फाटा मार्गावरून जाऊन थेट खालापूर येथे द्रुतगती मार्गावर जाता येणार आहे. याच कालावधीत मुंबईपुणे राज्य महामार्गावर एकाच वेळी वाहनांची गर्दी होऊन कोंडी होण्याची शक्यता असल्यामुळे अवजड वाहने द्रुतगती मार्गावर ६ किलोमीटरनंतर थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पुजारी यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाणीकपातीच्या संक्रांतीतून यंदा मुंबईकरांची सुटका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -