घरमहाराष्ट्रनागपूरनागपूरमध्ये चंद्रशेखर आझाद संस्थेच्या गणेशोत्सवावर पोलिसांची कारवाई, अध्यक्ष आणि कार्यकर्ते ताब्यात

नागपूरमध्ये चंद्रशेखर आझाद संस्थेच्या गणेशोत्सवावर पोलिसांची कारवाई, अध्यक्ष आणि कार्यकर्ते ताब्यात

Subscribe

नागपूरच्या चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेची वादग्रस्त गणेशमार्ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या वाद विवादला गणेशोत्सवात माध्यमातून लोकांसमोर आणले जातात. गणेशोत्सवच्या काही दिवसांनी गणेशाची मूर्ती दर्शनासाठी प्रदर्शित करण्यात येते.

या गणेश उत्सव मंडळावर पोलिसांची नेहमी नजर असते. या मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर देखावा केला होता त्यारून या वर्षी पण पोलिसांनी देखावा व गणेशमूर्ती आपल्या ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी मंडळाचा गणपती ज्या ठिकाणी बसवला जातो तिथे ही कारवाई केली. आतापर्यंत अनेक प्रकरणे या वादग्रस्त गणेश मंडळावर पोलिसांनी दाखल केली आहेत.

- Advertisement -

वर्षी या मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर देखावा केला होता. त्यारून या वर्षी पण पोलिसांनी देखावा व गणेशमूर्ती आपल्या ताब्यात घेतली. या कारवाईला विरोध करणारे अध्यक्ष चंद्रशेखर पुरी आणि काही कर्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. आमच्याकडे परवानगी असून तुम्ही कोणत्या नियमानुसार आम्हाला प्रतिबंध घालत आहात? असा प्रश्न या मंडळाने पोलिसांना विचारला. पोलीस आणि मंडळाच्या अध्यक्षांमध्ये काही काळ बाचाबाची झाली.

चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पुरी यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमच्याकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत असूनही पोलिसांनी बेकायदेशीरपणे यावर निर्बंध घातल्याचा आरोप केला आहे. आम्ही गणपतीची पूर्ण तयारी केली. सर्वजण एकत्र जमले होते. काही पत्रकार आणि फोटोग्राफर आले होते. पोलिसांनी गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात येणारी जागेला चारही बाजूंनी वेढा घातला. त्यांनी १० ते १२ कार्यकर्त्यांना अडवलं, असे पुरी यांनी सांगितले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -