घरमहाराष्ट्रNana Patole Car Accident : विरोधकांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?...

Nana Patole Car Accident : विरोधकांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेसचा सवाल

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा मंगळवारी (9 एप्रिल) रात्री उशीरा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे.

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा मंगळवारी (9 एप्रिल) रात्री उशीरा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे. (Lok Sabha Election 2024 Nana Patole Car Accident Does BJP want to win the election by eliminating the opposition Congress question )

अतुल लोंढे यांनी ट्वीट करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल विचारला आहे. तसेच त्यांनी म्हटले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोलेंना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत, अशी माहिती अतुल लोंढे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : वंचितच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांनी वडेट्टीवारांवर साधला निशाणा

- Advertisement -

दरम्यान, नाना पटोले यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर येथील प्रचारसभा संपवून राहत्या गावी सुकळी येथे जाताना भिलेवाडा जवळ माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? पोलीस याची चौकशी करतील. परंतु आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम व परमेश्वराच्या कृपेने मी सुखरूप आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.

हेही वाचा – MNS : भाजपाला पाठिंबा देताच राज ठाकरेंना धक्का; पदाधिकाऱ्याचा राजीनामा

अपघाताचा पोलिसांकडून तपास सुरू (Police are investigating the accident)

दरम्यान, नाना पटोले यांच्या गाडीच्या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच याप्रकरणी ते पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -