घरमहाराष्ट्रनागपूरDevendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात अशी परिस्थिती... देवेंद्र फडणवीस का म्हणाले असं?

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात अशी परिस्थिती… देवेंद्र फडणवीस का म्हणाले असं?

Subscribe

Lok Sabha Election 2024 : आम्ही परस्परांचे वैचारिक शत्रू निश्चित आहोत. राजकीय भूमिका वेगळ्या असल्याने आमच्यात मतभेद आहेत, पण आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अशी परिस्थिती कधी उद्भवली नाही आणि उद्भवणारही नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी राजकीय घातपाताची शक्यता फेटाळून लावली.

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा मंगळवारी (9 एप्रिल) रात्री उशीरा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातानंतर काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसने केला. काँग्रेसच्या या आरोपाबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही शक्यता फेटाळून लावली. नाना पटोले हे माझे मित्र आहेत, त्यांचा अपघात झाल्याचे कळल्यावर मी स्वतः त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ते अशाप्रकारे कोणताही आरोप करतील, असं मला वाटत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis’s reply to the allegations made by Congress on Nana Patole’s accident)

नाना पटोले यांनी स्वतः अपघाताची माहिती देताना सांगितले की, काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर येथील प्रचारसभा संपवून राहत्या गावी सुकळी येथे जाताना भिलेवाडा जवळ माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न, याची चौकशी पोलीस करतील. परंतु आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम व परमेश्वराच्या कृपेने मी सुखरूप आहे, असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान, नाना पटोले यांच्या गाडीच्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच याप्रकरणी ते पुढील तपास करत आहेत. या अपघाताबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Nana Patole Car Accident : विरोधकांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेसचा सवाल

आम्ही वैचारिक शत्रू पण… (We are ideological enemies but…)
महायुतीचे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नागपुरात आलेल्या देवेंद्र फडणवीसांना गाठत प्रसार माध्यमांनी नाना पटोले यांच्या अपघाताबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी आपण पटोले यांची फोनवरून चौकशी केल्याचे सांगितले. तसेच आम्ही परस्परांचे वैचारिक शत्रू निश्चित आहोत. राजकीय भूमिका वेगळ्या असल्याने आमच्यात मतभेद आहेत, पण आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अशी परिस्थिती कधी उद्भवली नाही आणि उद्भवणारही नाही, असे सांगत फडणवीसांनी राजकीय घातपाताची शक्यता फेटाळून लावली. (Devendra Fadnavis’s reply to the allegations made by Congress on Nana Patole’s accident)

- Advertisement -

काँग्रेसचे म्हणणे काय? (What does Congress say?)
अतुल लोंढे यांनी ट्वीट करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल विचारला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशीर्वादाने नाना पटोलेंना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत, अशी माहिती अतुल लोंढे यांनी दिली. (Devendra Fadnavis’s reply to the allegations made by Congress on Nana Patole’s accident)

हेही वाचा – Vishwajeet Kadam : मविआने सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा, विश्वजीत कदमांची पक्षश्रेष्ठींना विनंती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -