Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अकोला राड्याप्रकरणी नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न

अकोला राड्याप्रकरणी नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न

Subscribe

अकोल्यात घटना घडल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तास उशीर का झाला? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित करत गृह खात्यावर ताशेरे ओढले आहेत.

शनिवारी रात्री अकोल्यातील हरिहरपेठ भागांत दोन गटात सोशल मीडियाच्या पोस्टवरून वाद झाला. त्यानंतर या भागात कलम 144 लागू करण्यात आले. या भागांत दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तयार केला. पण या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर आणि गृह खात्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेद्र फडणवीस यांच्यासमोर पोलीस यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अकोल्यात घटना घडल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तास उशीर का झाला? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित करत गृह खात्यावर ताशेरे ओढले आहेत. (Nana Patole’s question to Devendra Fadnavis in the Akola Riots case)

हेही वाचा – ‘सरकार बदलल्यावर…’, राऊतांचा शिंदे-फडणवीसांना धमकीवजा इशारा

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, ज्यावेळी अकोल्यामध्ये ही घटना घडली त्यावेळी या प्रकरणाची तक्रार दाखल होत असतानाच घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यासाठी तासाभराचा उशीर का लागला? त्याशिवाय या घटना या पोलीस प्रशासनाकडून घडविण्यात येत आहेत का? महाराष्ट्रामध्ये हिंदू-मुस्लीम दंगली घडविण्याचे काम राज्य सरकारकडून घडविण्यात येत आहेत का? असा आमचा आरोप आहे, असे यावेळी नाना पटोले यांनी म्हंटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील माहिती जाणून घेण्यासाठी नाना पटोले हे अकोल्याला जाणार आहेत. राज्यात कोणत्याही जाती-धर्मात भांडण होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्यामुळे या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उत्तर दिले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असेही यावेळी नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले.

दंगली घडवणाऱ्याला आम्ही सोडणार नाही. या पद्धतीचा आव आणण्याचे काम फडणवीसांनी करू नये, असा सल्ला यावेळी नाना पटोले यांच्याकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. तसेच घटनेच्यानंतर पोलिसांकडून त्या ठिकाणी जमलेल्या जमावाची समजूत का काढण्यात आली नाही. कलम 144 लागू करून शहराचा विकास थांबविणे हेच काम आहे का?, घटना घडल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री आहेत, ते त्या ठिकाणी का नाही पोहोचले, असा प्रश्न देखील नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

- Advertisement -

तर, प्रदीप कुरुलकर यांच्या प्रकरणावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, कुरुलकर हे आरएसएसशी संबंधित आहेत. ते एक वैचारिक संस्थान आहे. अशा पद्धतीचा आरएसएसचा व्यक्ती आपल्या देशाची माहिती शत्रू देशाला देत असेल तर याबाबत आरएसएसने उत्तर दिले पाहिजे. पण त्या व्यक्तीशी आमचा काहीही संबंध नाही, असे संस्थेकडून का सांगण्यात येत आहे. असेही यावेळी नाना पटोले यांच्याकडून विचारण्यात येत आहे.

- Advertisment -