घरमहाराष्ट्र'थांब रे, मध्ये बोलू नको', राणेंनी फडणवीसांसमोरच केलं दरेकरांना गप्प

‘थांब रे, मध्ये बोलू नको’, राणेंनी फडणवीसांसमोरच केलं दरेकरांना गप्प

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील सोबत होते. दरम्यान, हा दौरा करताना नारायण राणे हे अधिकाऱ्यांना फटकारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. राणे अधिकाऱ्यांशी बोलत असताना दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असता राणेंनी त्यांना ‘थांब रे, मध्ये बोलू नको’ असं म्हणत गप्प केलं. राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूण शहराची पाहणी केली. यावेळी हा प्रकार घडला. पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना झापत होते. त्याचवेळी दरेकरांनी मध्यचे बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी राणेंनी त्यांना गप्प केलं.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

(अधिकाऱ्यांना उद्देशून) तुम्हाला सोडू का, त्या मॉबमध्ये सोडू का आता?
(प्रवीण दरेकरांच्या दिशेने हात करत) थांब रे मध्ये बोलू नको
(प्रवीण दरेकरांनी हलकीशी मान डोलावली)
(पुन्हा अधिकाऱ्यांना उद्देशून) मॉबमध्ये सोडून येऊ?
काय चेष्टा समजली? एवढी लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत
मग, त्यांचं आयुष्य उद्धवस्त झालं आणि तुम्ही हसताय. दात काढताय?
(अधिकाऱ्याचं उत्तर – हसत नाही सर, मी पहिल्यापासूनच इथे)
इथं काय करताय. इकडे ऑफिसमध्ये काय? तिकडे यायला पाहिजे ना तुम्ही
चला दाखवा ऑफिस तुमचं कुठं आहे…

‘थांब रे, मध्ये बोलू नको’, राणेंनी फडणवीसांसमोरच केलं दरेकरांना गप्प

‘थांब रे, मध्ये बोलू नको’, राणेंनी फडणवीसांसमोरच केलं दरेकरांना गप्प

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, 27 July 2021

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -