घरठाणेमच्छर जरी चावला तरी मुख्यमंत्र्यांनी पाठवला असे म्हणणारे.., शिंदे गटाचा ठाकरे गटाला...

मच्छर जरी चावला तरी मुख्यमंत्र्यांनी पाठवला असे म्हणणारे.., शिंदे गटाचा ठाकरे गटाला टोला

Subscribe

ठाण्यातील किसननगरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात झालेल्या राड्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राजन विचारे मुख्यमंत्र्यांना एवढे घाबरत आहेत की, रात्री त्यांना स्वप्नात देखील मुख्यमंत्री दिसतात. मच्छर जरी चावला तरी मुख्यमंत्र्यांनी पाठवला असे म्हणणारे हे लोक, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, अशा शब्दांत बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावर टीका केली आहे.

बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ही सर्व मंडळी मुख्यमंत्र्यांना एवढं घाबरतायतं की, रात्रीची त्यांची झोप उडालेली आहे. त्यांना रात्री स्वप्नात सुद्दा मुख्यमंत्री दिसतात. मारहाण झाली असं त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितल. परंतु योगेश जानकर हे आमचे नगरसेवक आहेत. त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रसंग घडल्यानंतर भटवाडीतील सर्व नागरिक खाली उतरले. जेव्हा त्यांना पकडलं तेव्हा हे खासदार स्वत: रिक्क्षातून पळाले असं लोक म्हणतात, असं नरेश म्हस्के म्हणाले.

- Advertisement -

तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पाहून त्या ठिकाणचे सात-आठ कार्यकर्ते जे होते, त्यांचा तो स्वभाव पाहून कार्यकर्त्यांना पुढे ढकललं आणि ते पळून गेले. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी शिंदे साहेबांना पाठिंबा दिला त्यांनी त्यांची चूक मान्य केली. असे नेते असतील आम्हाला माहीती नव्हतं, असे कार्यकर्ते म्हणाले. तुम्ही जर मुख्यमंत्र्यांवर टीका करत असाल तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की, सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका. राजन विचारेंना मच्छर जरी चावला तरी ते म्हणणारं आहेत की, मुख्यमंत्र्यांनी हा मच्छर पाठवला. त्यामुळे आम्ही त्यांच्या अशा वक्तव्याला महत्त्व देत नाही, असंही नरेश म्हस्के म्हणाले.

किसनगर येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाच्या संजय घाडीगावकर यांनी एक बैठक बोलावली होती. बैठकीला खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. बैठक ज्या ठिकाणी सुरू होती त्याच ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते एका कार्यक्रमासाठी जमले होते. एका क्षणी दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले आणि हाणामारी झाली. या हाणामारीत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तसेच या राड्याप्रकरणी सध्या पोलीस तपास सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, मुंबईनंतर ठाण्यातही काळ्या रंगाच्या बॅनरने चर्चेला उधाण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -