घरमहाराष्ट्रनाशिकअकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस शुक्रवारचा मुहूर्त

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस शुक्रवारचा मुहूर्त

Subscribe

नाशिक : महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्यासाठीची प्रक्रिया येत्या शुक्रवार (दि.22) पासून सुरु होणार आहे. सोमवारी (दि.18) अर्ज प्रक्रियेसंदर्भात महत्वाचे परीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश फर्‍ेयांचे सविस्तर वेळापत्रक प्रसिध्द केले जाणार आहे.

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच गेल्या 30 मेपासून अकरावी प्रवेशाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रिभूत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरायची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती दाखल करायची आहे. तर इयत्ता अकरावीची शाखा व महाविद्यालयाच्या पसंतीक्रम निवडीकरीता अर्जाचा भाग दोन सुरु होण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून होती. अखेर सोमवारी शिक्षण विभागाने यासंदर्भात परीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवार (दि.22) पासून सुरु होणार आहे. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाचा व आयसीएसई बोर्डांचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता सीबीएसई बोर्डाच्या निकालाची प्रतीक्षा लागून आहे.

- Advertisement -

10 पसंतीक्रम नोंदविता येणार

अर्जाच्या भाग दोनअंतर्गत किमान एक ते कमाल दहापर्यंत पसंतीक्रम नोंदविता येतील. शाखा, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. यापूर्वीच्या नियमानुसार पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालयाकरीता निवड झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -