घरताज्या घडामोडीमालेगावात एकाच कुटुंबातील सहाजणांना कोरोना; दोघांचा मृत्यू 

मालेगावात एकाच कुटुंबातील सहाजणांना कोरोना; दोघांचा मृत्यू 

Subscribe

मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच असून, शुक्रवारी (दि.24) मालेगावात एकाच कुटूंबातील सहाजण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्टवरून निष्पन्न झाले आहे. दिवसभरात मालेगावात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा रुग्णालयास सायंकाळी मालेगावातील 23 संशयित रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असून सुदैवाने ते सर्व निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेस दिलासा मिळाला आहे. मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 116 झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारपासून रमजान महिन्यास प्रारंभ होत आहे. त्यातच मालेगावातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. मालेगावात शुक्रवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पहिला 65 वर्षीय पुरुष रुग्ण मालेगावच्या सामान्य रुगणालयात २१ एप्रिल रोजी दाखल झाला होता. तर दुसरा 37 वर्षीय पुरुष रुग्ण मन्सुरा रुग्णालयात २२ एप्रिल रोजी दाखल झाला होता. तसेच शुक्रवारी एकाच कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने आरोग्य विभाग हादरुन गेला आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात 10 व सिन्नर दोन, लासलगाव व चांदवड येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यातील गोविंदनगर व लासलगावचा रुग्ण डॉक्टरांच्या यशस्वी उपचारानंतर बरा झाले आहेत. या ठिकाणी आठवड्यात एकही नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही, त्यामुळे आरोग्य विभागास दिलासा मिळाला आहे.

नाशिक कोरोना अपडेट

- Advertisement -

पॉझिटिव्ह रुग्ण – 130

मालेगाव – 116 (मृत 11)

नाशिक शहर १० (बरे झालेले रुग्ण 01)

नाशिक जिल्हा 04 (बरा झालेला रुग्ण 01)

निगेटिव्ह रुग्ण 722

प्रलंबित रिपोर्ट 200

उपचार घेत असलेले रुग्ण 117

शुक्रवारी दाखल झालेले रुग्ण 12

जिल्हा रुग्णालय 09

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय 03

मालेगाव रुग्णालय 00

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -