घरमहाराष्ट्रनाशिककोटमगावसह ६ देवस्थानांना ’ब’ वर्ग दर्जा

कोटमगावसह ६ देवस्थानांना ’ब’ वर्ग दर्जा

Subscribe

यात्रास्थळ विकास योजने अंतर्गत याठिकाणी अधिक सुविधा प्राप्त करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार

नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत येवला तालुक्यातील कोटमगाव प्रसिद्ध श्री जगदंबा देवस्थान, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील श्री रेणुका माता मंदिर,देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री.रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणे येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान तसेच पिंपळगाव बसवंत येथील श्री. क्षेत्र श्रीराम मंदिरास ब वर्ग प्राप्त झाला आहे. या तीर्थक्षेत्रांना ’ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने या तीर्थक्षेत्राच्या विविध विकास कामांसाठी शासनाकडून लवकरच अधिक निधी प्राप्त होऊन या देवस्थानच्या ठिकाणी येणार्‍या भाविकांसाठी चांगल्या मूलभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे.

येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री. जगदंबा देवस्थान अतिशय प्रसिद्ध असून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील श्री.जगदंबा देवस्थानचा विकास करण्यात आला आहे. या मंदिर परिसरात भक्त निवास, सभामंडप, स्वच्छता गृह, पाण्याची सुविधा, परिसर सुशोभिकरण यासह विविध विकासाची कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविक या ठिकाणी अधिक मोठ्या संख्येने येत असतात. या भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यासाठी या देवस्थानास ब वर्ग दर्जा प्राप्त व्हावा याकरिता मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता.

- Advertisement -

येवला तालुक्यातील या प्रसिद्ध देवस्थानाला ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने पर्यटन तसेच यात्रास्थळ विकास योजने अंतर्गत याठिकाणी अधिक सुविधा प्राप्त करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्‍या भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. परिणामी याठिकाणी भाविक अधिक मोठ्या संख्येने येऊन पर्यटनात देखील वाढ होणार आहे. त्यामुळे परिसरातील अर्थकारणाला देखील अधिक गती प्राप्त होणार आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील या देवस्थानांना देखील ’ब’ वर्ग दर्जा प्राप्त
यामध्ये सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील श्री रेणुका माता मंदिर, देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री.रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणे येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान, तसेच पिंपळगाव बसवंत येथील श्री. क्षेत्र श्रीराम मंदिर यांना देखील ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -