घरमहाराष्ट्रनाशिक'सिटू'चे नेते डॉ. कराड यांना तडीपारीची नोटीस

‘सिटू’चे नेते डॉ. कराड यांना तडीपारीची नोटीस

Subscribe

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामगार नेते तथा सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड यांना शहर पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामगार नेते तथा सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड यांना शहर पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. डॉ. कराड यांच्यावर मारहाणीसह विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून कोणतीही सुधारणा होत नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना गुरुवारी, १८ एप्रिलला नोटीस पाठवत खुलासा मागवला आहे.

हे तर राजकीय दबावतंत्र

सर्वत्र निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पक्ष व संघटनांचे उमेदवारांचा प्रचार करत आहोत. भाजपा-शिवसेनेचा पराभव करण्याच निर्णय घेतला आहे. प्रचारात विरोधी पक्षाचे नुकसान करण्याच्या हेतून मुख्यमंत्री व युती सरकारने कारस्थान केले आहे. मी तीनवेळा निवडणूक लढलो आहे. त्यावेळी एकही नोटीस आलेली नाही. नोटीस पाठवून सरकार दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. कामगार चळवळ चालवू नका, कामगारांच्या मागण्यासाठी मोर्चे काढू नका, आवाज बुलंद करू नका, यासाठीच ही हद्दपारीची नोटीस आहे. – डी. एल. कराड, कामगार नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -