घरमहाराष्ट्रनाशिकचांदवड-लासलगाव रस्त्यावर तरुणाचा अपघाती बळी

चांदवड-लासलगाव रस्त्यावर तरुणाचा अपघाती बळी

Subscribe

एकाचा मृत्यू, तिघे जखमी

चांदवड लासलगाव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा जीपने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू आणि दोन जखमी झाले आहेत. याबाबत चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अक्षय दत्तू अहिरे (वय २०) रा. टाकळी, लासलगाव याचा मृत्यू झाला.

दरम्यान बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास चांदवड-लासलगाव रस्त्यावरील शिंदे वस्तीजवळ लासलगावकडून चांदवडकडे येणारी महिंद्रा कंपनीची मॅक्स गाडी क्रमांक एम एच ३९ एफ ९५२९ यावरील अज्ञात चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत समोरून येणाऱ्या दुचाकी क्र.एम एच १५ एफए ९५२९ व दुसरी दुचाकी क्र.एम एच १५ एफए ९४३० ह्यांना जोरदार ठोस दिली त्यात आदर्श मधुकर निकम, संकेत सुनील गरुड, गणेश उर्फ विकी अशोक केदारे सर्व रा.लासलगाव यांना दुखापत झाली तर अक्षय दत्तू आहिरे याच्या डोक्याला व हात-पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

गतिरोधकाची मागणी

“ चांदवड-लासलगाव रस्त्यावरील छोट्या-मोठ्या अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा निर्दशनास आले आहे.हा रस्ता अरुंद असून रस्त्यालगत लहान-मोठी खेडी तसेच वस्ती असल्याने नेहमीच वर्दळ असते परंतु अरुंद रस्त्यामुळे येथे अपघात हे नेहमीचेच झाले असून वहाने देखील भरधाव वेगाने जातात. वाहनांच्या वेगावर नियंत्रण यावे यासाठी स्थानिकांकडून या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. “

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -