देवळाली गावात कोयत्याने हल्ला 

youth refused to hug a friend due to his friend attacked him through knife

नाशिकरोड । देवळाली गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आपसातील वादातून कोयते व तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून उपनगर पोलीस तपास करत आहे. किरण बबन गोसावी (३०) रा. धनगर गल्ली, देवळाली गाव व संजय सुरेश झांजुटे (२८) रा. गांधीधाम देवळाली गाव हे दोन जण जखमी असून, गोसावी याच्या हातावर व पायावर गंभीर प्रकारच्या जखमा झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर  झांजुटे याच्या गालावर कोयत्याने वार करण्यात आला असून दोघांचीही तब्बेत स्थिर असल्याचे पोलीसांनी सांगितले. झांजुटे याचा सहकारी सागर सौदे यास उपनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल रोहकले यांनी सांगितले.