घरमहाराष्ट्रनाशिककांद्याची १२ फुट प्रतिकृती साकारत, काँग्रेस सेवा दलाची कांदा हमीभावासाठी आंदोलन

कांद्याची १२ फुट प्रतिकृती साकारत, काँग्रेस सेवा दलाची कांदा हमीभावासाठी आंदोलन

Subscribe

नाशिक : कांदा उत्पादक शेतकरयांच्या व्यथा शासन दरबारी मांडण्यासाठी काँग्रेस सेवा दलाच्यावतीने १२ फुट कांद्याची प्रतिकृती उभारत कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने बांधावर जाऊन मदत द्यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

काँग्रेस सेवादलाच्यावतीने महात्मा गांधी मार्गावरील काँग्रेस कमिटीसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध असो सरकारच्या धोरणांचा निषेध असो अशा प्रकारच्या विविध घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. पक्षाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील पदाधिकार्‍यांनी दिला.

- Advertisement -

या आंदोलनाप्रसंगी नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर, माजी नगरसेविका वत्सला खैरे, हनीफ बशीर, लक्ष्मण धोत्रे, शिराज जीन, बबलू खैरे, सुनील आव्हाड, विजय पाटील, मुन्ना ठाकूर, कैलास महाले, गौरव सोनार, कामिल इनामदार, धोंडीराम बोडके, अशोक लामगे, सिद्धार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण, संतोष हिवाळे, अलथमेश शेख, जावेद इब्राहिम, जगदीश वर्मा आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -