Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक दोन पोलीस अधिकार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू

दोन पोलीस अधिकार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू

शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास यादव भोये, पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांचा समावेश

Related Story

- Advertisement -

जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, फ्रंटलाईनवर काम करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना कोरोनाने विळख्यात घेतले आहे. शहर पोलीस दलातील शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास यादव भोये यांचे शनिवारी (दि.१) पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला तर शहर पोलीस दलातून जात पडताळणी कार्यालयात बदली झालेले पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. शहर पोलीस दलात ६७५ पोलीस अधिकारी व अंमलदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

फुलदास भोये शहर पोलीस दलात सेवा बजावत होते. सध्या त्यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर महिनाभरापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. कोरोना आल्यापासून नाशिक शहर पोलीस दलातील एकूण ६७५ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ५११ पोलीस कोरोनामुक्त झाले असून, सध्या १६४ पोलीस अधिकारी, अंमलदार कोरोना बाधित आहेत. त्यांचेवर पोलीस कोविड सेंटरसह विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहर पोलीस दलात १२ पोलीस अधिकारी व अंमलदार कोरोनामुळे शहीद झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -