Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक उकाड्यामुळे रोज शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी

उकाड्यामुळे रोज शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी

Subscribe

मनमाड परिसरात ३५-४० टक्के पोल्ट्री फार्म पडले बंद

जुनेद शेख

यंदा एप्रिलमध्येच तापमानाने मागील सर्व रेकॉर्ड तोडल्याने याचा फटका इतर घटका प्रमाणेच पोल्ट्री फार्म व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसत असून प्रचंड उकाड्यामुळे रोज शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी पडत आहे. यामुळे पोल्ट्री फार्म धारकांचे मोठे नुकसान होत असल्याने मनमाड शहर परिसरासह या भागातील तब्बल ३५ ते ४० टक्के पोल्ट्री फार्म बंद पडले आहे. तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

- Advertisement -

पोल्ट्री फार्म बंद पडत असल्यामुळे कोंबड्याची आवक कमी होत आहे. सध्या निवडणुकीची धामधूम सुरु असल्यामुळे हॉटेल, ढाब्यात गर्दी वाढली असल्याने कोंबड्याची जास्त मागणी होऊन लागली. आवक कमी आणि मागणी जास्त वाढल्यामुळे चिकनच्या दरात किलो मागे ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. कोंबड्या पाठोपाठ भाजीपाल्याची आवक ही घटली असल्याने त्यांच्या किमतीत ही वाढ झाली आहे एकीकडे पेट्रोल,डीझेल यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने नागरिक महागाईने त्रस्त झालेले असताना दुसरीकडे आता चिकन सोबत भाजीपाल्याचे भाव देखील कडाडल्यामुळे खावे तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

अनेक सुशिक्षित तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळले असून अनेकांनी कर्ज घेवून हा व्यवसाय सुरू केला आहे. पोल्ट्री फॉर्म धारक वेगवेगळ्या कंपन्याकडून कोंबडीचे पिल्लू घेऊन त्याचे पालन पोषण करतात. ४५ दिवसात कोंबडी तयार झाल्यानंतर या कोंबड्या कंपनीना दिल्या जातात. कोंबडीचे पिल्लू नाजूक असतात त्यांना जास्त उष्मा व जास्त थंडी देखील सहन होत नाही. यामुळे त्यांचे पालनपोषण करताना काळजी घ्यावी लागते. मात्र, यंदा पारा थेट ४१ ते ४२ अंशापर्यंत पोहोचला आहे. वाढत्या उष्म्यापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री फार्म धारकांनी वेगवेगळ्या उपयायोजन केल्या. मात्र, तरी देखील रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे.

मागणीमुळे भाव वधारले

- Advertisement -

यामुळे पोल्ट्री फार्म धारकामध्ये चिंता, भीती निर्माण होऊन सुमारे ३५ ते ४० टक्के पोल्ट्री फार्म धारकांनी मार्चपासून कोंबड्यांच्या पिल्लांची नवीन बैच टाकण्यास बंद केले. यामुळे कोंबड्यांची आवक कमी तर मागणी जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे चिकनचे भाव किलो मागे ४० ते ५० रुपयांनी वधारले असल्याने त्याचा फटका नागरीका सोबत काही प्रमाणात उमेदवारांना बसत असून त्यांचा खर्च वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

- Advertisment -