Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक दिल्ली पब्लिक स्कूल येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी

दिल्ली पब्लिक स्कूल येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी

शाळेसाठी अधिक वर्ष काम करण्याऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला

Related Story

- Advertisement -

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दिल्ली पब्लिक स्कूल येथे साजरी करण्यात आली. तसेच, ज्या शिक्षकांनी शाळेला ५ किंवा अधिक वर्षे सेवा दिली त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या मनोरंजनासाठी मिस्टर अँड मिस दिल्ली पब्लिक स्कूल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच, शिक्षकांसाठी फोटो बूथ, मेहंदी आणि बँगल कॉर्नर तयार केले होते. एक विनामूल्य मॉल विविध वस्तूंसह प्रदर्शित करण्यात आला जेथून शिक्षक वस्तु निवडू शकतात आणि घेऊ शकतात. मात्र विनामूल्य मॉल शॉपिंगमध्ये सहभागी होण्यासाठी मास्क घालण्याची आणि सॅनिटायझर असण्याची अट अनिवार्य होती. प्रा. व्ही. सी आणि संस्थेचे संचालकगौ तम राजघरिया यांनी शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि आव्हानात्मक काळात मेहनतीची प्रशंसा केली. संचालक राजघरिया आणि प्राचार्य डॉ. पुष्पी दत्त यांनी शिक्षकांना संबोधित केले आणि साथीच्या आव्हानात्मक काळात त्यांनी केलेल्या मेहनतीची आणि प्रामाणिक सेवांसाठी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्यांनी शिक्षक हे प्रगतिशील शाळांचे मजबूत आधारस्तंभ आहे असे मत व्यक्त केले.

- Advertisement -