घरमहाराष्ट्रनाशिककांदा उत्पादकांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा

कांदा उत्पादकांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा

Subscribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : प्रणव पवार यांनी घेतली दिल्लीत भेट

नाशिक : जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी दरवर्षी 22 हजार कोटींचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आयआयटी व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी सुश्रृत ग्रुपचे संचालक प्रणव पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी सुचना केंद्रीय भुपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांच्या मदतीसाठी प्रणव पवार यांना 5 लाखांचा धनादेश दिला.

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे श्री. गडकरी यांना आदर्श संसदपटू हा पुरस्कार आज नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचा पन्नास हजाराचा निधी होता. यासंदर्भात हा निधी मी नाशिकसाठीच खर्च करू इच्छीतो. त्यासाठी त्यात माझे साडे चार लाख रुपये देतो. या पाच लाखाच्या निधीतून द्राक्ष व कांदा उत्पादकांसाठी संशोधन व मदतीचे काम सुश्रृत ग्रुपचे प्रणव पवार यांच्या नेतृत्वाखाली व्हावे, असे श्री. गडकरी यांनी सांगितले.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील प्रश्नांबाबत सुरेशबाबा पाटील यांच्या समवेत सुश्रृत ग्रुपचे संचालक प्रणव पवार यांनी बुधवारी (दि.9) गडकरी यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले, नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने विविध अडचणींचा सामना करीत असतो. नाशिक हा कांदा उत्पादन करणारे देशातील आघाडीचा जिल्हा आहे. येथील शेतकर्‍यांचे कांदा वाहतूक, साठवणीतील अडचणी, भावातील चढउतार, नैसर्गिक संकटे आदींमुळे दरवर्षी बावीस हजार कोटींचे नुकसान होते. नाशिक, नगर, मनमाड तसेच नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक सातत्याने अडचणीत येतात. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, भाजीपाला, फळे आदींचे उत्पादन घेतले जाते.

त्यातून दरवर्षी सुमारे एक लाख कोटींची कृषी निर्यात होते. कृषी क्षेत्रातील कौशल्य, ज्ञान व तंत्राच्या वापरात हा जिल्हा पुढे असतो. यासंदर्भात महाराष्ट्रात 8 ड्रायपोर्ट उभारण्याच्या सूचना दिल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. कांदा उत्पादकांना मदतीची गरज आहे. त्याबाबत लॅाजिस्टीक सुविधांद्वारे हे नुकसान कमी करता येईल. यासंदर्भात रिसर्च, इनोव्हेशन आणि साठवणुकीबाबत संशोधनासाठी आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालयांनी त्यात पुढाकार घ्यावा. त्यासाठी व्हाईट कोल या जातीच्या बांबूच्या बहुउपयोगी कांदा साठवण चाळी तयार कराव्यात. या चाळींवर सौरउर्जा निर्मितीसाठी सोलर पॅनेल बसवावेत. बांबूचे रॅक करावेत व त्यात कांदा साठवावा. त्यातून 5 ते 10 लाख कांदा साठवता येईल, असे गडकरी म्हणाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॅा. सुभाष भामरे, खासदार रक्षा खडसे, विनय सहस्त्रबुद्धे, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर आदी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -