घरमहाराष्ट्रनाशिकव्हॅलेंटाइन्स वीकमध्ये पाच जणांची आत्महत्या; बागलाणमधील प्रेमीयुगुलाचा समावेश

व्हॅलेंटाइन्स वीकमध्ये पाच जणांची आत्महत्या; बागलाणमधील प्रेमीयुगुलाचा समावेश

Subscribe

बागलाण तालुक्यातील शेवरे गावालगत गडपायथ्याशी झोपडीत आढळला प्रेमीयुगुलाचा मृतदेह

प्रेमाचा आठवडा म्हणून व्हॅलेंटाइन्स वीक जगभरात साजरा होत असताना, नाशिक शहरासह जिल्ह्यात मात्र या आठवडाभरात प्रेमप्रकरणातून पाच बळी गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बागलाण तालुक्यातही बुधवारी (दि.११) एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकारांमुळे तरुणाईमधील वाढते नैराश्यदेखील अधोरेखित झाले आहे.

बागलाण तालुक्याच्या आदिवासी दुर्गम पश्चिम पट्ट्यातील शेवरे गावालगत गडपायथ्याशी एका झोपडीत प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळून आल्याने बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे. जायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ज्ञानेश्वर उमाजी पवार (२२, रा. भिलवाड, ता. बागलाण व प्रमिला रामु गवळी (१८, रा. शेवरे ता. बागलाण) हे दोघेही ६ फेब्रुवारी २०१९ पासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबियांनी नातेवाईकांसह इतरत्र शोध घेऊनही ते सापडले नाहीत. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी जायखेडा पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही केली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी गडाच्या पायथ्याशी एका झोपडीत एका युवकाचा व युवतीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती भिलवाडीचे पोलीस पाटील रवींद्र कुंवर यांनी जायखेडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यात हे मृतदेह ज्ञानेश्वर पवार व प्रमिला गवळी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून दोघांचे मृतदेह नागपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यात विषारी औषध सेवन केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांच्या कुटुंबांना घटनेची माहिती देत सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

शहरात दोन, ग्रामीण भागात दोन घटना

नाशिक शहरात गेल्या चार दिवसांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी प्रेमप्रकरणातून आयुष्य संपवल्याच्या घटना घडल्या. याशिवाय ग्रामीण भागातही एका तरुणाने आत्महत्या केली. प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येमुळे प्रेम व्यक्त करण्याच्या आणि ऋणानुबंध जपण्याच्या व्हॅलेंटाइन्स वीकमध्येच पाच जणांनी जीवनयात्रा संपवल्याचे पुढे आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -