घरताज्या घडामोडीदरोड्यातील तडीपार गुन्हेगार गजाआड

दरोड्यातील तडीपार गुन्हेगार गजाआड

Subscribe

दोनजणांना बंदुकीचा धाक दाखवून २० लाख ४५ हजार ३९८ रुपयांची रोकड हिसकावत फरार झालेल्या तडीपार सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. जितेंद्र रविंद्र शेटे (रा.पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तडीपार जितेंद्र शेटे अशोकस्तंभ येथे असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेस मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला अशोकस्तंभ परिसरात अटक केली. तो सराईत गुन्हेगार आहे. अक्षय कैलास बागुल (२१, रा.सिडको) व विशाल निकुंभ हे दोघे ब्रिक्स इंडिया कंपनीत कॅश रिसीव्हरचे काम करत होते. २८ मे २०१८ रोजी दोघेजण शहरातील दुकानांमधील जमा केलेली रोकड घेवून ते सिटी सेंटर मॉलसमोर आले. त्यावेळी शेटे याने साथीदारांच्या मदतीने दोघांना अडविले. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून व एअरगन एकाच्या डोक्यात मारली. त्यांच्याकडील २० लाख ४५ हजार ३९८ रुपयांची रोकड हिसकावत फरार झाले. त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -