घरमहाराष्ट्रनाशिकसिन्नर तालुक्यातील गुळवंच, देशवंडीत लम्पीचा शिरकाव

सिन्नर तालुक्यातील गुळवंच, देशवंडीत लम्पीचा शिरकाव

Subscribe

नाशिक : सिन्नर तालुक्यातील पांगरी आणि दुसंगवाडी या गावांपाठोपात आता गुळवंज व देशवंडीत लम्पी आजाराने शिरकाव केला आहे. पशुसंवर्धन विभागाने याची तातडीने दखल घेत 10 गावांमध्ये जनावरांचे लसिकरण सुरु केले आहे.
नायगाव व देशवंडी गावामधील जनावरांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गर्जे यांनी लागलीच मंगळवारी (दि.१३) गावात जाऊन जनावारांची पाहणी केली. तसेच पशुपालकांशी संवाद साधला. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने त्या गावांच्या पाच कि.मी परिसरातील पांगरी खुर्द, मिठसागरे, फुलेनगर, मलढोन, वावी, पिंपरवाडी, घोटेवाडी, कहांडळवाडी व सायाळे येथील गोवर्गिय जनावरांना लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण केले.

९४०० जनवारांचे होणार लसीकरण

गुळवंच लगतच्या गावांमधील ५ हजार ६०० तर, देशवंडी लगतच्या ३ हजार ८०० जनावरांचे असे एकूण ९ हजार ४०० जनावारांचे लसीकरण केले जाणार असल्याचे डॉ. गर्जे यांनी सांगितले.

लम्पी पासून असा करा बचाव 
  • गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा.
  • डास, माशा, गोचीड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करून बंदोबस्त करणे
  • निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येऊ नयेत म्हणून औषध लावणे 
  • गोठ्यांमध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे
  • रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी, जनावरांच्या स्थानिक बाजारात नेण्यास प्रतिबंध करणे
  • चारा कमी खाणार्‍या जनावरांचा तत्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून उपचार करून घ्यावे
  • बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी
  • कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेश बंदी करणे
  • रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे
  • आजारी जनावरांवर विषारी औषधे फवारणी करू नये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -