Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक ढिम्म प्रशासन किती नागरिकांचा बळी घेणार?; इंदिरानगरमधील अवैध अवजड वाहतूक सुरूच

ढिम्म प्रशासन किती नागरिकांचा बळी घेणार?; इंदिरानगरमधील अवैध अवजड वाहतूक सुरूच

Subscribe

नाशिक : परिसरातील होणार्‍या अवजड वाहतुकीमुळे 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून ढिम्म प्रशासन अजून किती जणांचा बळी घेणार आहे. ही वाहतुक त्वरित बंद न झाल्यास आल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना विधानसभा संघटक ऋषी वर्मा यांनी दिला आहे.

इंदिरानगर परीसर, डीजीपी नगर, वडाळा रोड, राजीवनगर, साईनाथ नगर, विनयनगर, या परिसरातून ट्रक, ट्रेलर, टँकरची अवजड वाहतूक सुरु आहे. यासंदर्भात अनेकवेळा परिसरातील नागरिकांनी निवेदने देउनही ढीम्म प्रशासनाला अद्यापपर्यंत जाग आलेली नाही. या रस्त्यांवरील अवजड वाहतुकीमुळे आतापर्यंत अवजड वाहतुक अपघातात २७ निष्पाप लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या संदर्भात गेल्या वर्षभरापासून प्रशासन, शहर पोलीस वाहतूक विभाग तसेच अनेक लोकप्रतिनिधींना वेळोवेळी सांगुन देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

- Advertisement -

अपघात टाळण्यासाठी ही अवजड वाहतूक प्रशासनाने त्वरीत बंद न केल्यास अवजड वाहतुकीविरोधात शिवसेना (उठाबा गट) आक्रमक भुमिका घेणार असून इंदिरानगरवासियांसह आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. आंदोलनात महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी तसेच मित्रपक्ष व स्थानिक नागरिकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

अवजड वाहतूक विरोधात आक्रमक आंदोलन

इंदिरानगर वडाळा, विनयनगर, डीजीपी नगर, साईनाथ नगर, कलानगर, राजीवनगर, परिसरातील नागरिकांनी अवजड वाहतुकीविरोधात जागे होऊन संघटीत होण्याची गरज आहे. रस्त्यावर उतरून विरोध करणे आवश्यक असल्याने याविरोधात शिवसेना आवाज उठविणार आहे. रस्त्यावरील अवजड वाहतूक त्वरीत न थांबल्यास अनेक जीव जात राहणार आणि नागरिक राजकारण बघत बसणार. हे टाळण्यासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेनेने दिलेल्या इशार्‍यावर प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी. : ऋषी वर्मा, शिवसेना विधानसभा संघटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -