Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Amitabh Gupta : कैद्यांच्या संख्येत होतेय वाढ, कारागृह व्यवस्थेवर वाढतोय ताण

Amitabh Gupta : कैद्यांच्या संख्येत होतेय वाढ, कारागृह व्यवस्थेवर वाढतोय ताण

Subscribe

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरले असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात 24 हजार कैद्यांची क्षमता असलेल्या कारागृहांमध्ये 42 हजार कैदी ठेवण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्याकडून देण्यात आली आहे.

नागपूर : राज्यात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एखाद्या गुन्ह्यामध्ये दोषी आढळलेल्या आरोपीची कारागृहामध्ये रवानगी करण्यात येते. ज्यामुळे आता महाराष्ट्रातील जवळपास सर्वच कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरले असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात 24 हजार कैद्यांची क्षमता असलेल्या कारागृहांमध्ये 42 हजार कैदी ठेवण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्याकडून देण्यात आली आहे. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना अमिताभ गुप्ता यांत्याकडून ही माहिती देण्यात आली. कैद्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवल्याने आता कारागृहातील व्यवस्थेवर ताण येत असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Amitabh Gupta : Increase in number of inmates increased the stress on the prison system)

हेही वाचा – थकीत घरभाडे मिळवून देण्याच्या बदल्यात लाच; आदिवासी विकास प्रकल्पाचा लेखाधिकारी अटकेत

- Advertisement -

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना कारागृह प्रशासनाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता म्हणाले की, कैद्यांची संख्या वाढत असल्याने कारागृह प्रशासनावर आलेला ताण कमी करण्यासाठी ज्या जिल्ह्यात कारागृह नाहीत अशा ठिकाणी नवे कारागृह बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह तयार केली जात आहेत. तर पुण्यातील येरवडामध्ये 03 हजार कैद्यांसाठी नवे कारागृह तयार केले जाणार आहे.

तसेच, राज्यातील कारागृहातील बंदिवानांसाठी सोयी सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार असून त्यासाठी कायद्यानुसार बंदीवानांचे जे हक्क आहे, ते त्यांना मिळवून देण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही अमिताभ गुप्ता यांच्याकडून सांगण्यात आले. कैद्यांची त्यांच्या नातेवाईकांसोबत होणाऱ्या भेटीची वेळ वाढवून देणे, फोन सुविधा देणे, कॅन्टीन सुविधेत सुधारणा करणे, गरम पाणी उपलब्ध करुन देणे अशा सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

याशिवाय, कागागृहात असणाऱ्या कैद्यांचे नियमित समुपदेशन व्हावे याकरता अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये कैद्यांचे मन आध्यात्मकडे वळवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्याच अनुषंगाने पंढरपूर वारीच्या वेळी कैद्यांची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यांचे मन आणि शरीर स्वस्थ राहावे यासाठी कैद्यांना नियमित योगा प्रशिक्षण देखील दिले जात असल्याची माहिती गुप्ता यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -