Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र Photography Day दृष्टीतून निवडलेल्या सृष्टीवरील सर्जनशील प्रवास

Photography Day दृष्टीतून निवडलेल्या सृष्टीवरील सर्जनशील प्रवास

Subscribe

कुठल्याही फोटोपेक्षा अधिक आवडीने बघितले आणि जपले जातात ते विवाह प्रसंगीचे फोटो, गेल्या काही वर्षात वेडिंग फोटोग्राफीमध्ये अनेक बदल झाले. मात्र आठवणींना उजाळा देण्यासाठी ते वेडिंग फोटोअल्बम व ते प्रसंग जतन करून ठेवण्याची भावना मात्र आजही तशीच आहे या क्षेत्रात काम करणारे नाशिकचे छायाचित्रकार सौरभ अमृतकर यांच्या विषयी थोडक्यात…

लहानपणापासून असलेली आवड ३ वर्षांचा असताना आत्याने खेळण्यातला कॅमेरा गिफ्ट केला डोळ्यासमोर हाताच्या बोटांचा गोल करून त्यातून बघण्याची दृष्टी तिने हेरली. मी त्या खेळण्यातल्या कॅमेर्‍याचं बटन आयुष्यात पहिल्यांदा प्रेस केलं. त्यानंतर आईचं बोट धरून शाळेत जाताना वाटेवरील वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य, पक्षी-प्राणी फुलपाखरांच, निरीक्षण माझ्या आवडीचं सातत्य ठेवणारी ठरली घरात पहिला कॅमेरा वडिलांनी घेतला रोलचा. त्यावेळी मी सात-आठ वर्षांचा असेल, पण घरातील छोटा-मोठा प्रत्येक समारंभ मी घरच्यांसोबत केवळ फोटोग्राफर म्हणूनच साजरा करू लागलो होतो.

- Advertisement -

माझे समाधान म्हणून माझ्या ‘रेडी पोझ’ ‘स्माईल प्लीज’ या शब्दांवर वडीलधारी मंडळी कौतुकाने माझ्या पुढ्यात उभी राहायची. तब्बल १२-१३ वर्ष माझ्या पोझ पोझ या शब्दाचा उच्चार ‘पोझिशन प्लीज’ होईपर्यंत या कॅमेर्‍याशी माझी निखळ आणि घट्ट मैत्री झाली होती. आमची ही मैत्रीची वीण अधिक घट्ट होण्यासाठी सर्वाधिक मदत झाली ती आता माझ्याकडे असलेल्या डिजिटल कॅमेर्‍याची गेल्या पाच ते सहा वर्षांपासून माझे मैत्रीपूर्ण संबंध जपतानाच. माझी आर्थिक बाजूही भक्कम करण्यासाठी या कॅमेर्‍याने मला मदत केली. माझी आणि त्याची दृष्टी एक झाल्यापासून आम्ही बर्‍याच आठवणी साठवू लागलो होतो. मी केलेली ऑब्जेक्टची निवड तो तांत्रिकरित्या अधिकच खुलवत होता. लहानपणापासूनच्या कॅमेरारुपी मित्राने दिलेली ही दृष्टीच मला नव नव्याने काम मिळवून देण्यात अत्यंत महत्वाचा वाटा उचलणारी ठरली असं म्हटलं तरी वावगं न ठरावं, कोणत्याही गोष्टीच्या यशस्वीतेसाठी त्या गोष्टीचा सर्वांगाने विचार २४x७ डोक्यात असावा लागतो तसेच त्या क्षेत्रातला एक मार्गदर्शकही गरजेचा असतो.

या क्षेत्रात माझ्या डोक्यातल्या कलांना मूर्त स्वरूप देणारे मार्गदर्शकही माझ्याजवळचेच होते. ते म्हणजे माझे आई-वडील व नंतर नाशिकचे ज्येष्ठ छायाचित्रकार प्रताप पाटील काका. त्यांनी मला या विषयातील बारकावे जाणून घेण्यासाठी अभ्यासासाठी देखील मार्गदर्शन केले. घरच्यांचं असलेलं सहकार्य व मनात असलेली उत्कंठा अशी इच्छा अधिकच दृढ झाली. कॅमेरा घ्यायचा आणि बाहेर फिरायला जायचे एवढीच कल्पना तेव्हा मनात असायची. निसर्ग सहल नाशिकच्या गोदाघाटावर फेरफटका सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, मेळावे असे अनेक उपक्रमांची रूपरेषा आखली जाऊ लागली होती. फेरफटका मारता मारता कॅमेरा सरसावला आणि अनेक वैविध्यपूर्ण फोटोज् कॅमेर्‍यात कैद झाले मग नाशिकचा गोदाघाट असो वा आजूबाजूचा परिसर प्राणी, पक्षी, निसर्ग सौंदर्य या व यापेक्षाही अप्रतिम असे फोटोज् कॅमेर्‍यात कैद झाले. हळूहळू ओळख वाढत गेली व नाशिकचा एक माझ्यासारखा सामान्य फोटोग्राफर उदयास आला फोटोग्राफीचे अजून चांगले शिक्षण घे तुझं करिअर घडव चांगला क्लास करून घे असा अनमोल सल्ला त्यावेळी काकांनीच मला दिला.

- Advertisement -

क्लासदेखील पूर्ण झाले. पुढे जाऊन चौघुले, टाक, संजय जगताप, प्रसाद पवार, सुनील जाधव पुणे यासारखे दिग्गज अनुभवी मार्गदर्शक मला लाभले. या सर्वांनीच मला डिजिटल कॅमेर्‍यातील बारीक-सारीक त्रुटी, सेटिंग समजावून सांगितल्या. पुढे जाऊन प्री-वेडिंग, लग्न सोहळा, बर्थडे पार्टी, डोहाळेजेवण सिनेमॅटिक, मॉडेलिंग फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंगसाठी मला बोलावले जाऊ लागले, अनेक स्पर्धा झाल्या त्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले कोणतीही स्पर्धा असो त्यात सौरभचा सहभाग असतोच असतो. आज सौरभ हा नाशिकच्या नामवंत फोटोग्राफरांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागलाय. अनेक ग्राहकांच्या घरचाच एक सभासद म्हणून ग्राहकांची देखील त्याला आज पहिली पसंती असते. सर्वच छायाचित्रकार मित्रमैत्रिणी मोठ्या भाऊ-बहिणीसारखे कायम पाठीशी उभे असतात.

आता हेच मित्र-मैत्रिणी फक्त मित्रच नाही तर एक कुटुंब बनलंय. या गोष्टीचा उल्लेख नेहमीच तो त्याच्या बोलण्यातून न विसरता करत असतो. त्याची लहान बहीण व आई-वडिलांच मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच त्याच्या पाठीशी आहे. स्वकष्टातून आता सौरभने निकॉनचा मिररलेस कॅमेरा घेतला आहे. छायाचित्रण हा शब्द जरी सोपा असला तरी क्षणभरात घडणारी गोष्ट आयुष्यभर आठवणीत ठेवण्याचे कार्य छायाचित्रकार करतात. कॅमेरा हातात धरला व बटण दाबले की आपोआपच फोटो येतो असे अनेकांना वाटत असते, पण एका उत्कृष्ट फोटोग्राफरसाठी कॅमेर्‍याचे मॅनेजमेंट, शटर स्पीड, अ‍ॅपारचर, व्हाईट बॅलन्स, लाईट सेटिंग फोटोच्या चौकटीत योग्य पद्धतीने बसवणे आणि क्षणार्धात घडलेली गोष्ट टिपणे तितकेच अवघड असल्याचेही तो आपल्या बोलण्यातून सांगतो. सौरभने विविध संमेलनांत फोटोग्राफी करून पारितोषिकेही मिळविली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकला झालेल्या सभेत देखील सौरभने फोटोग्राफी केली आहे. सौरभला नुकताच फोटोग्राफी विभागात महाराष्ट्र युवा कला गौरव राजस्तरीय पुरस्कारही मिळाला आहे.

- Advertisment -