कत्तलखान्यात जाणारे चार लाखांचे गोधन जप्त

देशी गोवंशांची अवैधरित्या कत्तलखान्यात वाहतूक करणारे वाहन सापळा रचून पकडण्यात यश

सुरगाणा : तालुक्यात देशी गोवंशांची अवैधरित्या कत्तलखान्यात वाहतूक करणारे वाहन भाजप कार्यकर्त्यांनी सापळा रचून पकडले. आठ जनावरे व वाहनचालकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,जामुनमाथा येथे पिकअप (क्र.एमएच ०६ एजी ५५५९) या गाडीत गोवंश जातीची जनावरे कोंबून, जखडून ठेवून कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे व हे वाहन जामुनमाथा येथून प्रतापगडमार्गे जाणार आहे, असे समजताच  विजय कानडे, धनराज देशमुख, गणेश जाधव, मनोज पवार, भगवान वाघमारे कार्यकर्ते  तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

प्रतापगड गावात मारुती मंदिरासमोर गाडी येताच वाहनचालक कादिर अकिल नाईक (रा. जामुनमाथा) यास विचारले असता त्याने उडवाउडवीची उतरे दिली. वाहनाची तपासणी केली असता आठ गोवंश जातीच्या जनावरांना दोरीने बांधलेले दिसले.पोलीस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक सागर नांद्रे, हवालदार हेमंत भालेराव अधिक तपास करत आहेत.