घरक्राइमपोलीस आयुक्तांकडून रथयात्रा मार्गाची पाहणी

पोलीस आयुक्तांकडून रथयात्रा मार्गाची पाहणी

Subscribe

श्रीराम आणि गरुड रथयात्रा मार्गाची मंगळवारी (दि.१६) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पाहणी केली. त्यांनी श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात श्रीराम आणि गरुड रथोत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधिकार्‍यांना दिल्या.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे पाहणी दौरा झाल्यानंतर श्री काळाराम मंदिरात आले. यावेळी मंदिर विश्वस्तांनी मंदिरात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात काळाराम मंदिराचे विश्वस्त धनंजय पुजारी, श्रीराम रथोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू आण्णा शेळके, कार्याध्यक्ष राकेश शेळके, सेक्रेटरी नंदकुमार मुठे, खजिनदार कल्पेश दीक्षित, सभासद राहुल कुलकर्णी, नितीन शेलार, राज जोशी, शुभम गवळी, रावसाहेब कोशिरे, महेश दीक्षित, रवींद्र दीक्षित, चैतन्य दीक्षित, मयूर इघे यांच्यासह पदाधिकार्‍यांची बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रथोत्सव समितीच्या सूचनांबद्दल आयुक्तांनी पोलीस अधिकार्‍यांना योग्य मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -