घरक्राइमपुन्हा एकदा अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत त्र्यंबकरोडच्या लॉजमध्ये

पुन्हा एकदा अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत त्र्यंबकरोडच्या लॉजमध्ये

Subscribe

अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत दोन दिवसांपूर्वी कुटुंबियांना न सांगता त्र्यंबकेश्वरमधील आशीर्वाद नावाच्या लॉजमध्ये मुक्कामी थांबल्याचे समोर आले आहे. तिचा कुटुंबियांनी शोध सुरु केला असता ती प्रियकरासोबत लॉजमध्ये गेल्याचे समजले असता त्यांना धक्का बसला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर सामाजिक प्रतिष्ठेपोटी कुटुंबियांनी कोणतीही तक्रार दिली नाही. यानिमित्ताने अल्पवयीन मुलीस प्रियकरासोबत लॉजमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे स्पष्ट होते.
त्र्यंबकरोडवरील काही लॉजमध्ये अनैतिक प्रकार सुरु असल्याची बाब ‘आपलं महानगर’ने पुढे आणली आहे. मात्र, त्र्यंबकरोडवरील लॉजमध्ये असे प्रकार घडतच नाही, अल्पवयीन मुलींना लॉजमध्ये प्रवेश दिलाच जात नाही, असे दावे काही लॉजचालकांकडून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून माहिती घेतली असता वेगळेच प्रकार आता समोर येत आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या संपर्क साधला असता त्यांनी त्र्यंबकरोडवरील लॉजमध्ये दोन दिवसांपूर्वी प्रेमीयुगुल मुक्कामी थांबल्याचे सांगितले.

अंबडमधील अल्पवयीन मुलगी व प्रियकर नातलग आहेत. नात्यातील असल्याने दोघांची जवळीक सुरुवातीला कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र, दोघेजण नाशिक शहराबाहेर फिरण्यास जावू लागले. ही बाब त्यांच्या कुटुंबियांना खटकली. दोघांनी एकत्र फिरण मान्य नसल्याने कुटुंबियांनी त्यांची समजूत काढली. सुरुवातीला दोघांनी कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे बोलणे व भेटणे टाळले. मात्र, काही दिवसांनी पुन्हा बोलणे व फिरण्यास सुरुवात केली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या वडिलांनी प्रियकराला पुन्हा समजले. तरीही, दोघांमध्ये काही फरक पडला. दोन दिवसांपूर्वी अचानक दोघे जण गायब झाले. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला असता दोघे जण त्र्यंबकेश्वरमधील आशीर्वाद नावाच्या लॉजमध्ये मुक्कामी असल्याचे समजल्याचे समोर आले. दोघांना समजून सांगूनही काही फरक पडत नसल्याने त्यांचे कुटुंबिय मंगळवारी (दि.१५) रात्री अंबड पोलीस ठाण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र, दोघांच्या कुटुंबियांनी एकमेकांशी संवाद साधत मुलामुलींच्या भविष्यावर विपरीत परिणाम व्हायला नको, असे ठरवून तक्रार देण्यास नकार दिला. या घटनेत महत्वाचा मुद्दा म्हणजे, लॉजचालकाने मुलीला लॉजमध्ये प्रवेश देताना तिचे आधारकार्ड तपासले नव्हते का? तपासले असते तर तिचे वय समजले असते. परंतु केवळ पैशांच्या लोभापायी अशा गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करणार्‍या लॉजधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

‘आपलं महानगर’ ‘अनैतिकतेचे लॉजिंग’ मालिका सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील आपल्या प्रतिक्रिया ९०२२५५७३२६ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवाव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -